google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीसिनेनामा 

‘ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलमध्ये झळकले पुणे

गेल्या आठवड्यात भुवनेश्वर येथे खळबळ माजवल्यानंतर ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलने भारताच्या पहिल्या फॅशन फेस्टिव्हलचा मोहरा 9 मार्च रोजी पुण्याकडे वळवला. हा सोहळा आपल्यासोबत घेऊन आला विविध लक्झरी फॅशन ब्रॅंड्सचे अत्यंत स्टायलिश अनुभव, भारतातील काही उत्कृष्ट लाइफस्टाइल ब्रॅंड्सने बनवलेले वेधक पॉप-अप्स आणि लोकप्रिय कलाकारांनी दिलेले लयदार संगीत परफॉर्मन्सेस.


या फेस्टिव्हलमध्ये उपस्थित राहिलेल्या लोकांना फॅशन आणि स्टाइलने ओतप्रोत असा एक आकर्षक नाव अनुभव मिळाला. या प्रसंगी एक आकर्षक फॅशन शो योजण्यात आला होता. जो प्रख्यात डिझाईनर वरुण बहलने सादर केला आणि त्यात फॅशन नेक्स्ट स्पॉटलाइट हे फॅशन डिझाईन काऊंसिल ऑफ इंडियाने तयार केलेले सादरीकरण देखील होते. या सादरीकरणात भारतातील 9 आघाडीचे डिझाईनर – अल्पना नीरज, ब्लोनी अंतर अग्नी, मंदिरा विर्क, गीशा डिझाईन्स, वेरान्डा, श्वेता कपूर, तानिया खनुजा आणि नितीन बाल चौहान   सहभागी होते. वरुण बहलने सुंदर अभिनेत्री अदिती राव हैदरीसह एक असे कलेक्शन सादर केले, ज्यामध्ये परंपरा आणि इनोव्हेशन यांचा सुभग संगम होता.

काळाने मान्य केलेले तंत्र होते आणि डिझाईनमध्ये आधुनिक ट्विस्ट होता. फॅशन नेक्स्ट स्पॉटलाइट मध्ये 3 आगळ्यावेगळ्या थीम्समधून नवीन फॅशन ट्रेंड्स सादर करण्यात आले, जे सध्या बदलत्या फॅशन क्षेत्रात सर्वोच्च स्थानी आहेत: वॉन्डरलक्स मध्ये हॉलिडे वेअरमध्ये लक्झरीचा प्रभाव दाखवण्यात आला’ ग्लॉस अँड ग्लॅम मधून हाय फॅशनमधील आधुनिक ग्लॅमर दाखवण्यात आले आणि इंटरग्लॅमॅटिकमधून भविष्यवेधी फॅशनचे दर्शन घडले.


या फेस्टिव्हलमध्ये नाशेर माइल्स, अनिशा गांधीची द स्टाइलिंग रूम, जॉन जेकब्स, ऑल यू कॅन स्ट्रीट, डूडल मॅपल्स, मायग्लॅम आणि ऑडी पुणे या लाइफस्टाइल ब्रॅंड्सच्या सहयोगाची एक शृंखला देखील सादर करण्यात आली. या ब्रॅंड्सनी नावीन्यपूर्ण DIY अनुभव, मालसामानाची जिवंत कला, स्टाइलिंग स्टेशन वगैरेंसह एक पॉप अप्स श्रेणी सादर केली आणि फेस्टिव्हलमध्ये सामील होणाऱ्यांचे भरपूर मनोरंजन केले.


डीजे कायानचा प्रारंभिक अॅक्ट आणि ऋत्विजचा एक रॉकिंग सेगमेन्ट या जबरदस्त संगीत परफॉर्मन्सेसमुळे वातावरण उत्साहाने भारून गेले होते. या ठेक्यावर थिरकण्याची संधी उपस्थितांना मिळाली. व्हीजे आणि अभिनेत्री अनुशा दांडेकरने या समारंभाचे सूत्रसंचालन केले, जिच्यामुळे या फेस्टिव्हलच्या स्टाइलमध्ये भरच पडली.


पेरनॉड रिकार्ड इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक मोहिन्द्र म्हणाले, “आपण भारतातील फॅशनचा चेहरा-मोहरा बदलत असताना ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हल एक आकर्षक नवीन फॉरमॅट घेऊन आले आहे, जो नवनवीन शहरांत एक उदाहरण स्थापित करत आहे. स्टाइल आणि ग्लॅमरच्या दुनियेत एक आकर्षक गेटवे बनण्याच्या आमच्या व्हिजनशी मिळत्या जुळत्या भारतातील काही फॅशन डिझाईनर्सशी, सेलिब्रिटीजशी आणि लाइफस्टाइल ब्रॅंड्सशी सहयोग करताना आम्ही रोमांचित आहोत.”
फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलविषयी बोलताना डिझाईनर वरुण बहल म्हणाला, “ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलने पुण्यात एक वेधक, अनोख्या प्रकारचा फॅशन फेस्टिव्हल अनुभव दिला. माझ्या कलेक्शनचा मुख्य चेहरा असलेल्या अदिती राव हैदरीसोबत फॅशन अनुभवाचे नवीन रूप अभिव्यक्त होताना पाहण्याचा अनुभव गौरवाची जाणीव देणारा होता.”अदिती राव हैदरी म्हणाली, “भारतातील पहिलेवहिले फॅशन फेस्टिव्हल सुरू करून ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलने पुण्यात स्टाइल आणि ग्लॅमरच्या भविष्याचे दर्शन घडवले. वरुणचे कलेक्शन त्याची सिग्नेचर स्टाइल दर्शवते आणि रेड कार्पेट फॅशनमधल्या भावी फॅशनचे ग्लॅमरस अर्थघटन करते. त्याने डिझाईन केलेले अनोखे पोशाख परिधान करून रॅम्प वॉक करण्याचा अनुभव अद्भुत होता.”

ब्लेंडर्स प्राइड ग्लासवेअर फॅशन नेक्स्टचे क्यूरेटर-इन-चीफ आशीष सोनी म्हणाले, “ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलने भारतातील फॅशन अनुभवात एक आकर्षक बदल घडवून आणला आहे. यात केवळ भावी ट्रेंड्सचे प्रदर्शन नाही, तर या मंचाने हाय फॅशन, ग्लॅमरस स्टाइल आणि एक आकर्षक फेस्टिव्हल अनुभव नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. असे यापूर्वी कधीच घडले नव्हते.”या ब्रॅंडशी आपलेल्या जुन्या संबंधाबद्दल बोलताना FDCI चे अध्यक्ष सुनील सेठी म्हणाले, “फॅशन डिझाईन काऊंसिल ऑफ इंडिया ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलचा एक भाग होताना अभिमान अनुभवते आहे. फॅशन नेक्स्ट स्पॉटलाइट क्यूरेट करताना आम्ही रोमांचित आहोत कारण यामध्ये भारतातील काही अत्यंत पुरोगामी विचारसरणीच्या डिझाईनर्सच्या नवीन स्टाइल ट्रेंड्सचे दमदार प्रदर्शन करण्यात आले आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!