सातारा
संक्रांतीच्या सणाची चाहूल बाजारपेठेत…
सातारा (महेश पवार) :
येत्या 15 जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या नववर्षातील मकर संक्रांति सणाची चाहूल आता सातारा येथील बाजारपेठेत दिसून येत आहे. शहरातील राजवाडा परिसरात विविध रंगातील सुगडी आणि मातीची बोळकी तसेच लुटावयाच्या वस्तू आणि सौंदर्य प्रसाधने तसेच महिलांचे नकली दागिने विक्रीसाठी स्टॉलवर महिलांची मोठी गर्दी होत आहे. संक्रांती च्या वाणवसा साठी लागणारे पूजा साहित्य ,हळद ,कुंकू ,रेवडी . बत्तासे ,सुपार्या यांच्याही विक्रीचे स्टॉल सध्या सातारा शहरात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.