‘त्यांची लक्षवेधी बोंडारवाडी धरणाला खो घालण्याचा प्रकार’
बोंडारवाडी प्रकल्पाचा प्रश्न 2010 पासून भिजत घोंगड्यासारखा पडला आहे . इतक्या वर्षांनी त्यांना लक्षवेधी करण्यासाठी वेळ मिळणे आणि सिंचन विभागाकडूनच हा प्रकल्प व्हावा यासाठी त्यांनी आग्र धरणे हे तांत्रिकदृष्टया अयोग्य ठरणार आहे केवळ बोंडारवाडी चे श्रेय आपल्यालाच मिळावे यासाठी हा आटापिटा आहे अशा भूमिकेमुळे 54 गावातील रहिवासी पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार असून त्यांची ही मागणी आम्ही सुरू केलेल्या बोंडारवाडी धरणाला खो घालण्याचा प्रकार आहे अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा नामोल्लेख टाळून केली
बोंडारवाडी प्रकल्पाच्या संदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती त्या संदर्भाच्या निमित्ताने खासदार उदयनराजे यांनी त्यांच्या या भूमिकेवर टीका केली आहे जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की बोंडारवाडी धरणामुळे पिण्याचे पाणी आणि सिंचन असे दोन्ही हेतू साध्य करण्याचा प्रयत्न एकाच वेळी झाल्यास कृष्णा खोरे सिंचन लवादामध्ये हा प्रकल्प निश्चितपणे अडकून पडणार आहे . धरणाचे काम पूर्ण होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यावर उपलब्ध शिल्लक पाण्याचे सिंचनासाठी नियोजन करता येईल आणि तांत्रिकदृष्ट्या हा लावादांमध्ये अडकणार नाही . म्हणूनच प्रथम पिण्याच्या पाण्याची तहान भागवून घेतल्यावर धरणातील शिल्लक पाण्याचा सिंचनासाठी वापर करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन मंजूर असलेल्या ट्रायलफीट आणि रेखांकनानुसार पिण्याचे पाण्याचे धरण बांधणे हे लोकहित आणि सामान्य जनतेच्या दृष्टीने लाभकारक आहे .
बोंडारवाडी प्रकल्पाचा प्रश्न 2010 पासून बळवलेला आहे आज इतक्या वर्षांनी लक्षवेधी करण्यासाठी वेळ मिळणे आणि सिंचन विभागाकडून हा प्रकल्प व्हावा असा आग्रह तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आहे केवळ बोंडारवाडी प्रकल्पाचे श्रेय आपल्यालाच मिळावे यासाठी हा आटापिटा आहे परंतु अशा भूमिकेमुळे 54 गावाचे लोक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत . त्यांची मागणी पाहता आम्ही सुरू केलेल्या बोंडर वाडी धरणाला खो घालण्याचा हा प्रकार होऊ शकतो बोंडारवाडी धरणाखाली जास्तीत जास्त एक एकर जमीन जाणार आहे परंतु जनसामान्यांची तहान भागवण्यासाठी आम्ही लागणारी जमीन देत आहोत कोणत्याही परिस्थितीत बोंडारवाडी धरण तांत्रिकदृष्ट्या योग्य असताना विभागाकडून पूर्ण करून 54 गावांची तहान भागवण्याचा आम्ही कटिबद्ध आहोत अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी पत्रकार नमूद केली आहे या धरणासाठी 2018 मध्ये शासन स्तरावरून पिण्याच्या पाण्याचे पाणी आरक्षण आम्ही मंजूर करून घेतले त्यामुळे जावळी तालुक्यातील 54 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार होता त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे भूसंपादन जमीन आमच्या मालकीच्या असताना लोकांना पाणी मिळेल या भावनेने सदर प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आमचे जमीन आम्ही उपलब्ध करून दिली.