जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीच्या निकालाचा काँग्रेसने घेतला आढावा
मडगाव :
दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर आणि विधीमंडळ गटनेते युरी आलेमाव, वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख यांनी दवर्ली जिल्हा पंचायत पोट निवडणुकांचे कॉंग्रेस उमेदवार लिओनसियो रायकर आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत निवडणूक निकाल आढावा बैठक घेतली. काँग्रेस पक्ष तळागाळात मजबूत करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे, असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.
आम्ही कुठ्ठाळी जिल्हा पंचायत उमेदवार वेलेंट बार्बोसा आणि कुठ्ठाळी मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांनाही भेटलो आणि निकालांचा आढावा घेतला. आम्ही त्वरित पाऊले उचलून कॉग्रेस मजबूत करण्यासाठी सुधारात्मक उपाय करू असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
या बैठकांना सरचिटणीस सुभाष फळदेसाई आणि प्रदिप नाईक, कॅप्टन विरिएटो फर्नांडिस, ओलेन्सियो सिमोयस, एव्हरसन वालीस, ऑर्विल दौराद रॉड्रिग्स, सुकूर, पीटर डिसोझा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आम्ही एकंदर आढावा घेतला असून आम्ही आतापासून काम सुरू करू. आवश्यक निर्णय घेवून योग्य पाऊले उचलण्याचा आणि उणीवा दूर करण्याचा आम्हाला विश्वास आहे, असे एम के शेख यांनी सांगितले.