
‘अशी’ केली जाऊबाईंनी फायद्याची शेती…
महेश पवार (सातारा) :
शेती परवडत नाही असे अनेक जण म्हणतात पण जर का शेती काळजीपूर्वक कष्ट घेऊन केली तर ती फायद्याची कशी आहे हेच जैतापूर येथील ज्योती आणि मंजू यांनी दाखवून दिले. आपण सध्या बघतोय एकीकडे दुष्काळाचे सावट आहे तर दुसरीकडे शेतमालाला भाव मिळत नाही यामुळे अनेक जण म्हणतात शेती परवडत नाही घर कसं चालवायचं ओरडत बसतात, पण सातारा रहिमतपूर रस्त्यावरील जैतापूर पेट्रोल पंपा समोर ज्योती संतोष गुजर व मंजू प्रवीण गुजर या सख्ख्या जावांनी आपल्या शेतात पिकणाऱ्या उसाचे रसवंती ग्रह तर शेतात पिकणाऱ्या पेरू च्या बागेतील पेरूची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री सुरू करून शेती तोट्याची नव्हे तर फायद्याची कशी हे दाखवून दिले.

सातारा रहिमतपूर रस्त्यावर जैतापूर येथील पेट्रोल पंपा समोर रस्त्यालगत ज्योती व मंजू यांची शेती असून या शेतीमध्ये मंजू यांनी 18 गुंठ्यामध्ये जवळपास 240 पेरूची लागवड केली आहे. आता या पेरूचा बहर सुरू झाला असून जवळपास एका झाडाला शंभर ते दीडशे पेरू लागले असून, हे पेरू त्यांनी व्यापाऱ्याला पन्नास रुपये किलोने न देता स्वतःच या पेरूंची शेतकरी ते ग्राहक विक्री सुरू केली. ग्राहकांना या ठिकाणी हवा तसा झाडाचा आपल्या आवडीप्रमाणे पेरू मिळत असल्याने या ठिकाणी पेरू घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते , सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक पेरू साधारण एक किलो वजनाचा असून हा भला मोठा पेरू 70ते80 रूपये दराने थेट ग्राहकांना विक्री करतात, यामुळे त्यांना चांगला फायदा होत आहे , कारण हाच पेरू शेतकरी जेव्हा व्यापाऱ्याला देतो तेव्हा 40 ते 50 रुपये किलो भावाने जातो आणि तोच ग्राहकांना शंभर ते दीडशे रुपये किलोने घ्यावा लागतो , परंतु जर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन व काळजीपूर्वक शेती केली आणि शेतकरी ते ग्राहक अशी आपल्या मालाची विक्री केली तर शेती फायद्याची ठरते असे मंजू प्रवीण गुजर यांनी सांगितले .
मंजू यांच्यासोबत त्यांच्या जाऊबाई ज्योती संतोष गुजर यांनी देखील आपल्याच शेतात उसाचे उत्पादन घेऊन या ठिकाणी रसवंती गृह सुरू केले आहे . अशा पद्धतीने दोन्ही जावांनी शेती पूरक व्यवसाय करत अन्य शेतकऱ्यांना शेती केली तर ती कशी फायद्याची ठरू शकते हे दाखवून दिले , यामुळे जाऊ बाई जोरात म्हणायला हरकत नाही…

“भूमीची भूमिका ठरते महत्त्वाची”
शेतकऱ्यांच्या घरात मुलगी जन्माला आली की घरचे म्हणतात लक्ष्मी आली तशीच काहीशी गोष्ट आहे मंजू प्रवीण गुजर यांच्या मुलीची म्हणजेच भूमीची , भूमी साधारण दहा वर्षाची असुन तिचे वडील नोकरी निमित्त बाहेर असल्याने भूमी आपल्या आईला प्रत्येक कामात मदत करते . महत्त्वाचे म्हणजे पेरू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानंतर आईला मदत करतेच , परंतु आई बागेत गेल्यावर ती याठिकाणी स्वतः ग्राहकांना पेरू ची विक्री करते आणि आपल्या आईला मदत करून भूमी महत्वाची भूमिका बजावते.
