google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

सलग चौथ्यांदा प्रवीण पाटील केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी

सातारा (महेश पवार) :

तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन त्रैवार्षिक निवडणूक सन 2022 ते 2025 पार पडली यात प्रवीण पाटील पॅनलने सागर पाटील केमिस्ट पॅनलचा धुव्वा उडवत प्रवीण पाटील यांनी सलग चौथ्यांदा आपल्या विजयाची मोहर उमटवली. सातारा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी एकूण 605 मतापैकी 570 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला , मतदारांनी  प्रवीण पाटील पॅनलवर विश्वास दाखवत 570 मतदानापैकी  414 मतं देऊन प्रवीण पाटील पॅनेलला निवडून आणले  .

प्रवीण निवासराव पाटील यांची सातारा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड तर महेंद्र उत्तमराव कदम यांची सचिवपदी तर महेश शिवाजी साळुंखे उपाध्यक्ष , रणजित विजयराव मोहिते खजिनदार, तर जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी अभय दत्तात्रय गरगटे , मनोज कुमार लक्ष्मीनारायण मर्दा , शशिकांत सर्जेराव ढाणे , अभिजीत रमेश रानभरे  यांची निवड करण्यात आली तर . तालुका कार्यकारणी सदस्यपदी सचिन चंद्रकांत कदम , विशाल निवृत्ती जाधव  पंकेश कुमार पारसमल ओसवाल ,  सचिन वसंतराव लोखंडे , सिकंदर मोहम्मद सलीम मुल्ला, अजय सुभाष शिंदे, प्रदीप अशोक बर्गे यांची निवड करण्यात आली .

प्रवीण पाटील-: प्रवीण पाटील पॅनल सलग चौथ्यांदा निवडून आले हीच आजवर केलेल्या कामांची पोचपावती आहे , निवडणूक आली म्हणून खोटी आश्वासनं,भाषण, खोटे नाटे आरोप करून कधीच विजय मिळवता येत नाही तर , आम्ही आजवर केलेल्या कामांवर विश्वास टाकत मतदारराजाने मतदान रुपी दिलेला कौल , यामुळेच या निवडणुकीत प्रवीण पाटील पॅनलने सलग चौथ्यांदा विजय मिळवला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!