विश्रामगृहातले ते ‘गाढव’ कोणाच्या गोठ्यातले?
सातारा (महेश पवार) :
सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शासकीय विश्रामगृह हे बांधकाम विभागाच्या अतिरिक्त असून याची देखभाल व्यवस्था नेमकी कोणाच्या हातात असा यक्षप्रश्न उपस्थित होत आहे ?
खरंतर संविधानिक पदसिद्ध अधिकारी तसेच आजी माजी सैनिक व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी असलेल्या, या विश्रामगृहात फुकट्याचा वावर असल्याचे चित्र दिसून येते आहे . या ठिकाणी बैठका किंवा राहण्याची व्यवस्था करायची असल्यास सर्व शासकीय सोपस्कार पाडूनच देणे गरजेचे असताना , कोणीही कधीही येतं आणि या ठिकाणी बैठका घेतं आणि राहतं? यामुळेच शासकीय विश्रामगृहाची अवस्था ही आओ जाओ घर तुम्हारा अशी झाली ?
या ठिकाणी शासकीय सोपस्कार पार न पडता या ठिकाणी गोळा करण्यात येणारा पैसा नक्की कोणाची तिजोरी भरतोय ? याची चौकशी होणार का ?असा प्रश्न सर्वसामान्य सातारकरांना पडत आहे.