google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

निरीक्षण गृहातील बालकांसोबतची अनोखी दिवाळी

सातारा (प्रतिनिधी) :

एकादा संकल्प करताना सोप्प वाटत पण सामाजिक उपक्रमात सातत्य राखणं अवघड असते. ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांचे निरीक्षण गृहातील बालकांचा दिपावलीचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी सर्व बालकांना कपडे घेतात. तर एक तप याच बालकांच्या वाढदिवसाचा उपक्रम राबवतात साजरे करतात ही बाब निश्चितपणे समाजाला दिशादर्शक आणि प्रेरणादाई असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले.

निरीक्षण गृहातील बालकांचे वाढदिवस आणि कपडे वितरण प्रसंगी ते बोलत होते. जयवंशी पुढे म्हणाले, जेष्ठ पत्रकार काटकर यांनी आपल्या मोजक्या मित्रांना सोबत घेऊन निरीक्षण गृहातील अनाथ मुलांची दिवाळी गोड करण्यासोबत त्यांचे एकत्रित वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प आदर्शवत आहे. दिवाळीच्या पुर्व संध्येला निरीक्षण गृहातील मुलांसोबत एकत्रीत वाढदिवस व अनोखी दिवाळी साजरी करण्याचा आनंद मला लाभला. संस्थेतील बालकांच्या निवासासाठी सुसज्ज इमारती बरोबर अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यात प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार, महिला व बालकल्याण अधिकारी विजय तावरे, जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, माहिती अधिकारी हेमंत चव्हाण, निरीक्षण गृहाचे संचालक किरण नाना साबळे, इतर मान्यवरांची उपस्थित होते.

पत्रकार शरद काटकर राबवत असलेला हा अनोखा उपक्रम कदाचित राज्यात एकमेव असावा. असलेल्या आपल्या मोजक्या मित्रांना सोबत घेत येथील मुलांना दिवाळीचा आनंद ओसांडून वहातोय. भविष्यात माझ्याकडून या बालकांसाठी शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करण्याचा मानस पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी व्यक्त केला.

सातारा येथील निरीक्षण गृहातील मुलांमधून भविष्याचा कर्तव्यदक्ष आधिकारी तयार व्हावा. त्यांचे मार्गदर्शन मुलांना मिळावे म्हणून प्रत्येक वर्षी मान्यवर व्यक्तिं, जिल्हाधिकारी,एसपी यांना बोलावून त्यांच्या उपस्थित मुलांना प्रेरणा शरद काटकर देत असतात. काटकरांच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेकांचे योगदान लाभते हा दातृत्वाचा व संवेदनांचा फक्त कार्यक्रम नसून ते समाजाप्रती व निरीक्षण गृहातील मुलांच्या उज्जल जडणघडणीसाठी असल्याने हे व्रत स्विकारले आहे. त्यासाठी मोजक्या मित्रांचे मला मोलाचे सहकार्य असते असे मत शरद काटकर यांनी बोलताना कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमात आजपर्यंत अनेक मान्यवर पाहुणे आले. त्यांनी मुलांसाठी निरीक्षण गृहासाठी भरभरून मदत केली. आपण देखील करावी अशी मागणी देखील जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांकडे केली. या कार्यक्रमात मुलांचे एकत्रीत वाढदिवस साजरे करण्यात आले.

दान सत्पात्री होतय याची खात्री झाली की समाजातील मदतीचे हात पुढे येतात. मी निमित्त मात्र आहे. या उपक्रमाच्या सातत्यासाठी माझ्या मित्रांचा माझ्यावरचा विश्वास कारणीभूत आहे. उपक्रम चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असली तरी गेल्या आठ दहा वर्षात कधीही काहीही कमी पडले नाही. या उपक्रमामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी विद्यमान आयुक्त अश्विन मुग्दल, जी. श्रीकांत, श्वेता सिंग्घल, पोलीस विशेष महासंचालक संदिप पाटील, संजय राऊत यांच्यासह शेकडो अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन या बालकांना लाभले असल्याचे शरद काटकर यांनी सांगितले. संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी बालकाच्या दर्जेदार जेवणाबरोबर त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जात असल्याचे अवर्जून सांगितले.

सातारा येथील बाल निरीक्षण गृहातील दिवाळी संस्मरणीय असल्याचे संस्थेचे संचालक किरण साबळे पाटील यांनी सांगितले. एक व्यक्ति म्हणून समाजासाठी आपले दायीत्व असते. मात्र दैनंदिन जबाबदार्‍यामधुन समाजासाठी असणारे ऋुण फेडता येत नाही. मात्र शरद काटकर यांच्या सारखे मित्रांमुळे जगण्याचे मर्म समजल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अ‍ॅडव्होकेट योगेंद्र सातपुते व आभार महिला बाल कल्याणच्या काटकर मॅडम यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!