सातारा (प्रतिनिधी) :
शहरालगत असलेल्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या खिंडवाडी परिसरात सोमवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. हा बिबट्या हायवे क्रॉस करून जात असताना ही घटना घडली.
याच ठिकाणी आज पर्यंत चार बिबट्यांनी रस्ता क्रॉसिंग करताना आपला जीव गमावला आहे यामुळे या परिसरात उड्डाणपूल करण्याची मागणी वन्यप्रेमी केली जात आहे . मात्र शहरापासून जवळ असलेल्या जंगल परिसरात वाढत असलेला मानवी हस्तक्षेपामुळे वन्य प्राणी शहरात प्रवेश करू लागलेत . यामुळे भविष्यात या परिसरात अपघात होऊ नये म्हणून वनविभागाच्या मार्फत उपाययोजना करणार असल्याचे महादेव मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .