google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘बॉयकॉट आदिपुरुष’वर ओम राऊतने नोंदवले स्पष्ट मत

प्रभास-सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच नकारात्मक चर्चेत आला आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ‘बॉयकॉट आदिपुरुष’ हा ट्रेंड ट्विटरवर चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच सैफ, प्रभासची या चित्रपटामधील भूमिका प्रेक्षकांना फारशी पटली नाही. रावणाच्या भूमिकेमधील सैफला तर नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. चित्रपटाबाबत होणाऱ्या चर्चांवर आता ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊतने स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.

प्रसारमाध्यमांसाठी ‘आदिपुरुष’च्या थ्रीडी टीझरचं खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी दिग्दर्शक ओम राऊतही उपस्थित होता. ओमने स्क्रिनिंगदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधत चित्रपटाच्या ट्रोलिंगबाबत आपलं मत मांडलं. तसेच चित्रपटाबाबत आपलं मत मांडण्यासाठी प्रेक्षक अधिक घाई करत असल्याचं ओमचं मत आहे.

‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं का? असा प्रश्न ओम राऊतला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “लोक ज्याप्रकारे या चित्रपटाबाबत व्यक्त होत आहेत याबाबत मला कोणतंच आश्चर्य वाटत नाही. याउलट मला या गोष्टीचं वाईट वाटलं. रुपेरी पडद्याचा विचार करूनच मी हा चित्रपट बनवला आहे. पण ट्रोलिंग किंवा नकारात्मक चर्चा मी थांबवू शकत नाही. मोबाईवर पाहण्यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आलेला नाही. युट्यूबवर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित न करण्याचा पर्याय माझ्याकडे असता तर आज ‘आदिपुरुष’चा टीझर तिथे प्रदर्शित झालाच नसता. पण सध्या युट्यूब म्हणजे काळाची गरज आहे.”

तो पुढे म्हणाला, “आजच्या पिढीतील मुलांना रामायणाबाबत फारसं माहित नाही. म्हणूनच रामायणावर आधारित आम्ही हा चित्रपट बनवला आहे. जेणेकरून प्रत्येक पिढीतील सिनेरसिकांना याबाबत माहिती मिळेल. तसेच हा काही एनिमेशन चित्रपट नाही. लाइव्ह एक्शन सीन्स या चित्रपटासाठी चित्रित करण्यात आले आहेत. कॅप्चर तंत्रज्ञानाचा आम्ही चित्रपटासाठी वापर केला नाही.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!