बेपत्ता झालेल्या पणन सहसंचालकांचा मृतदेह अखेर निरा नदीत सापडला
सातारा (अभयकुमार देशमुख) :
पुणे पणन महासंचालक सहकारी संस्थेचे सहसंचालक शशिकांत घोरपडे हे बेपत्ता झाल्याची तक्रार शिरवळ पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. यानंतर सुमारे दोन दिवस शशिकांत घोरपडेंचा शोध घेण्याचं काम निरा नदी पत्रात सुरु होतं मात्र स्थानिक प्रशासनाला अपयश येत असल्याचं पाहुन NDRF च्या पथकाला सापडला पाचारण करण्यात आलं होतं. यानंतर आज NDRF नं घोरपडे यांचा मृतदेह नदीतुन काढण्यात यश मिळवलय.
शिदेंवाडी गावच्या हद्दीतील एका हाँटेलसमोरुन ते बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती मात्र त्यांचा मृतदेह मिळाल्यानंतर नक्की त्यांनी आत्महत्या का केली या बाबत तर्कवितर्क लढवले जावु लागले आहेत . ही आत्महत्या आहे की हत्या आहे या बाबतचे गुढ देखील वाढल्याचं पाहायला मिळतय.