
महात्मा गांधीजींबद्दल नेमके ‘काय’ बोलला संभाजी भिडे?
शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थान संघटनेच्या संभाजी भिडेने महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना गरळ ओकली आहे. ‘महात्मा गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास गांधी यांचे वडील नाहीत. त्यांचे खरे वडील हे एक मुस्लीम जमीनदार आहे’, असे तारे संभाजी भिडेने तोडले.
अमरावती शहरात गुरूवारी (27 जुलै) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भिडेंनी हे वक्तव्य केलं असून, यावरून वाद पेटला आहे.
झालं असं की, अमरावती शहरातील बडनेरा मार्गावर असलेल्या जय भारत मंगलम या ठिकाणी संभाजी भिडेंच्या सभेचं 27 जुलै रोजी रात्री आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना भिडेंने महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं.