google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

राज्य सरकार अस्थिर : पृथ्वीराज चव्हाण

सातारा (महेश पवार) :

महाराष्ट्र राज्यातील सरकार राहणार आहे की जाणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे धाडस सरकारकडून होत नाही. राज्यपाल नियुक्त १२ आमदार करायचे आहेत. पण, अंतर्गत वादामुळे त्यांची निवड धड करता येत नाही. त्यातच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे राज्यामध्ये अस्थिर स्थिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणेच लढणार असल्याने सरकार निवडणुका घेण्याचे सध्या तरी धाडस दाखवत नाही, असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केला.

सातारा येथे जिल्हा कॉंग्रेस कमिटीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेंद्र देसाई, राजेंद्र शेलार, कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, रजनी पवार, अन्वर पाशाखान, मनोजकुमार तपासे आदी उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जमिनी हस्तांतरीत करायच्या नाहीत असा सवार्ेच्च न्यायालयाचा निवाडा असतानाही जमीनी हस्तांतरीत केल्या. गरिबांचे नाव सांगून हस्तांतर होत असेल तर सरकारनेच सूट दिली आहे का काय? अशी साशंकता दिसत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आणखी प्रकरणे वाढतच आहेत. त्यामुळे एका बाजूला सरकार राहणार की जाणार ही सवार्ेच्य न्यायालयाच्या निकालावरच अवलंबून आहेे आता २0 मंत्री आहेत. अजून २३ मंत्री घेता येवू शकतील पण सध्याची स्थिती पाहता सरकार धाडस करत नाही. मंत्री केलेच अन सरकार पडले तर आठवडाभराचा मंत्री होणे कोणीही पसंत करत नाही. त्याचबरोबर पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कर्जे वेळेत भरली त्याला प्रोत्साहनपर अनुदान वेळेत देता येत नाही. एकूणच नियमीत पीक कर्जदार शेतकऱ्यांना लाभ दिला जात नसल्यामुळे राज्यात सरकार आहे की नाही तेच कळत नाही. त्यातच स्थानिक संस्थाच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रिपणे लढणार असल्याने सध्याचे सरकार निवडणुका घेण्याचे धाडस करत नाही.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सुप्रिम कोर्टाने हे सरकार वैध की अवैध याचा निवाडा देणे गरजेचे आहे. आज सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत. पक्षांतर बंदीच्या कायद्याचे उल्लंघनही झालेले दिसत आहे. त्यामुळे आता तारखा पुढे ढकलणे योग्य नाही. जनतेच्या विश्वासासाठी न्यायालयाचा निर्णय लवकर झालाच पाहिजे. बेराजगारीचा आकडा वाढत आहे. महागाई वाढत आहे. विकासात राज्य मागे पडत आहे. केंद्राच्या हस्तक्षेपामुळे प्रकल्प गुजरातमध्ये जातात. त्यातच सरकारवर विश्वास नसल्याने अनेक प्रकल्प राज्यात येत नाहीत, असे सांगून माजी मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, ‘कॉंग्रेसचे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा साडेतीन हजार कि. मी. सुरु केली. कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी ही यात्रा आहे. ही यात्रा ‘न भूतो न भविष्यती’ अशी ठरत आहे. पाच महिने यात्रा चालणार आहे. आता ती या महिन्यात श्रीनगरला झेंडावंदन करुन ही यात्रा संपणार आहे. त्यानंतर कॉंग्रेस देशात ‘हात जोडो’ अभियान सुरु करत आहेत. महाराष्ट्रातही या अभियानाची तयारी सुरु आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्य सरकारच्या प्रश्नावर राज्यात पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाले हे दिसून येत आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे. याचा निर्णय न्यायालाच्या निकालावर आहे. त्यामुळे सरकारबाबत काही सांगता येत नाही. त्यातच ५० आमदार फुटून गेले आहेत. त्यांच्यावर मतदारांचा आरोप होत आहे. त्यामुळे निवडणुका घेण्याचे सरकार धाडस करत नाही, एकूणच न्यायालयाचा निर्णय हा उध्दव ठाकरेंच्या बाजूने लागेल हे ब्लॅक ॲण्ड व्हाईट सत्य दिसत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. अजूनही येत आहेत, त्यामुळे राज्यात अस्थिर परिस्थिती आहे. त्यातच येवू घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रपणे येऊन लढविणार आहे. त्यामुळे राज्य सरकार निवडणुका घेण्याचे सहसा धाडस न दाखवता त्या सातत्याने पुढे-पुढे ढकलत आहे,’ असे माजी मुख्यमंत्री पृथवीराज चव्हाण यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!