google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात

सातारा ( महेश पवार) :
जिल्ह्यातील माण खटाव तालुक्याचे आमदार भाजप जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे (MLA jaykumar gore) यांच्या गाडीचा अपघात झाला असून, त्यांची गाडी पूलावरून 50 फूट खोल दरीत  कोसळली. साता-यातील फलटण येथे हा अपघात झाला आहे. अपघातात जयकुमार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात  उपचार सुरू आहेत , अशी प्राथमिक माहिती आहे.

जयकुमार गोरे (MLA jaykumar gore) हे पुण्यावरून गावी येत असताना फलटण जवळ हा अपघात झाला.  अपघात एवढा भीषण होता की, गोरे यांची गाडी पुलाचा कठडा तोडून थेट खाली 50 फूट खोल कार नदीत कोसळली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!