google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘शाश्वत शेतीसाठी ‘ही’ कंपनी करणार शेतकऱ्यांना संपूर्ण मदत’

कराड (अभयकुमार देशमुख) :

शुगर ग्रीड ऍग्रो प्रोड्युसर कं. वडूज आणि महाराष्ट्र राज्य कृषी विभागामार्फत पेडगाव येथील निवडक शेतकऱ्यांना २५ किलो सोयाबीन बियाणे व बीज प्रक्रिया औषधांच्या वाटपाचा कार्यक्रम शुगर ग्रीड अग्रो प्रोडयूसर कंपनीचे संस्थापक श्री. रणजितसिंह देशमुख ( भैयासाहेब) यांचे उपस्थितीत पार पडला.शेतीशाळे साठी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शास्वत शेतीसाठी कंपनी शेतकऱ्यांना कायम मदत करेल अशी खात्री देऊन शुगर ग्रीड अग्रो प्रोडयूसर कंपनीच्या माध्यमातून यापुढील काळात वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग, माती परीक्षण, बीज प्रक्रिया, मशागत प्रक्रिया,हमी भाव, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन कंपनी मार्फत ठेवण्यात येईल असे रणजित देशमुख यांनी सांगितले.


सदर शेतीशाळेस कृषी विभागातील मार्गदर्शक आर.जे.नाळे. – (मंडळ कृषी अधिकारी वडूज), डी.व्ही.बोराटे (कृषी पर्यवेक्षक वडूज), आणि जे.एन. सानप – (कृषी सहायक पेडगाव). यांनी सोयाबीन पिक लागवड माहिती, पिकाचे अर्थशाशस्त्र, बियाणे निवड व बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, बीज प्रक्रिया आणि कृषि विभाग विविध योजनांची माहिती दिली तसेच गणेश खिलारे ( सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक ) आत्मा खटाव यांनी शेतीशाळा व शेतकरी गट स्थापन करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या वर्षात पेरणी योग्य पाऊस नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पाऊस वेळेत पडला तरच सोयाबीन ची पेरणी करता येईल,पाऊस नसला तरी कंपनी मार्फत बियाणे,औषधे वेळेत मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून सोयाबीन साठी हमी भाव मिळाल्यास सोयाबीन उत्पादकांची संख्या आजून वाढेल असे मत पेडगाव मधील तरुण शेतकरी दत्तात्रय जगदाळे यांनी व्यक्त केले.

कंपनी चे संचालक ऍड. अजितकुमार घाडगे यांनी कंपनी राबवत असलेल्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देऊन या पुढील काळात कंपनी मार्फत पुरविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सांगितली.

कार्यक्रसास खटाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.संतोष गोडसे,बाजार समितीचे उप सभापती विजयराव शिंदे,बाजार समितीचे संचालक सौ.लता जगदाळे पेडगावचे सरपंच पोपटराव जगदाळे उपसरपंच नानासो जगदाळे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन हणमंतराव जगदाळे,डॅां.नितीन जगदाळे,अजय जगदाळे व अन्य संचालक जेष्ठ मार्गदर्शक विलासराव साळुंखे, माणिकराव जगदाळे सोयाबीन उत्पादक शेतकरी जगन्नाथ जगदाळे व अन्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!