तहानलेल्या बिबट्याला वनविभागाने दिले जीवनदान…
सातारा :
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील केरळ येथे तहानेने व्याकुळ झालेल्या बिबट्याची अक्षरशः परवड झाल्याची घटना समोर आली आहे.
दरम्यान मनदुरे केरळ येथील सदरची घटना असून तहानेने व्याकुळ बिबट्या गावात शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडली होती. सदर बिबट्याला नाहक त्रास देणाऱ्या एका युवकाला वन विभागाने ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर सदर बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेऊन त्याच्यावर औषध उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी एक बिबट्या पाटण तालुक्यातील केरळ गावाकडे येताना काही लोकांना दिसला लोकांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली मात्र ग्रामस्थ जवळ येऊनही हा बिबट्या कोणताही हल्ला करत नसल्याचे दिसून आल्याने या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली
हा बिबट्या तहानेने प्रचंड व्याकुळ झाला होता यामुळे त्याला हालचाल अथवा हल्ला करणे अशक्य झाले होते याबरोबरच बिबट्याला चालणे सुद्धा मुश्किल झाल्याचे दिसून आले दरम्यान या बिबट्याला पाहण्यासाठी केरळ परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली या घटनेची माहिती मिळताच वनविभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व सदर बिबट्याला त्यांनी ताब्यात घेतले आहे या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर आजारी बिबट्याला त्याच्या असाह्यतेचा फायदा घेऊन एक तरुण बिबट्याला वारंवार त्रास देत होता. दरम्यान या घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्याने सदर तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे.