सातारा
वडाचे म्हस्वे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ…
सातारा:
जावली तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वडाचे म्हस्वे परिसरात मानवी वस्तीत बिबट्यानं शिरकाव केल्याने परिसरातील नागरिकांची भाभेरी उडाली आहे. शनिवारी वडाचे म्हस्वे येथील एका गोठ्यात घुसून बिबट्या ने अनेक कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली आहे . यामुळे परिसरातील नागरिकांकडून बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीला जोर धरू लागला आहे.