अवकाळी पाऊस; नुकसानग्रस्त शेतींची रणजितसिंह यांनी केली पाहणी
कराड (प्रतिनिधी):
डांभेवाडी ता.खटाव येथे काल अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे, गारपिठीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या गारपीटीमुळे अनेक भागातील पिकांचे नुकसान झाले. प्रामुख्याने द्राक्ष बागांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आता तोंडाशी आलेला घास या लहरी वातावरणामुळे निघून गेला आहे.
या नुकसान ग्रस्त भागाचा तात्काळ कृषी विभागाचे अधिकारी संबंधित तलाठी व शेतकऱ्यांसह सकाळपासून ३ तास कॅांग्रेस नेते आणि हरणाई सहकारी सुतगिरणीचे संस्थापक चेअरमन रणजितसिंह देशमुख (भैय्यासाहेब) यांनी पाहणी करुन पंचनामे करुण घेतले.
यावेळी विश्वास तुपे,धनाजी निंबाळकर,जयकुमार बागल,रवी नलवडे,कल्पेश बागल,मारुती सपकाळ,अर्जुन बागल,हणमंत बागल,गोरख नलवडे,बाळासाहेब बागल,विजय बर्गे,केशव बागल,विक्रम बागल व ग्रामस्थ उपस्थित होते.