google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार ‘न्यूज लाईन सन्मान’

कराड :

द न्यूज लाईन वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त न्यूज लाईन सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव केला जाणार असून बुधवार दि. 25 जानेवारी 2023 रोजी कराड अर्बन बँक शताब्दी सभागृहामध्ये हा दिमाखदार समारंभ होणार आहे. शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा व संस्थेचा मानपत्र, मानचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सगाम कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने असून प्रांताधिकारी उत्तम दिघे यांची प्रमुख उपस्थिती असल्याची माहिती मुख्य संपादक प्रमोद तोडकर यांनी दिली.

चॅनेलच्या तृतीय वर्धापनदिन व गुणवंताचा सन्मान असे कार्यक्रमाचे स्वरूप असून कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी यशस्वी सांभाळणारे सीए दिलीप गुरव यांचा उत्तम व्यवस्थापक पुरस्काराने तर प्रा. डॉ. विनोद बाबर यांचा प्रेरणादायी वक्ता,  कल्पना तानाजी वाकडे यांचा संस्कारदिप, राजेंद्र जाधव यांचा प्रयोगशील शेतकरी, नामदेव थोरात यांचा उद्योजकता प्रेरणा, आदर्श समाजसेवक म्हणून संदीप पवार यांचा, मिनल ढापरे यांचा कलारत्न, मनोज जगताप यांचा उदयोन्मुख उद्योजक, नवोदित साहित्यिक पुरस्काराने अभयकुमार देशमुख यांचा, राहुल पुरोहित यांना अक्षरांचा जादुगर पुरस्काराने तर कुमारी आदिती जाधव हिला लक्ष्यवेधी नेमबाज म्हणून तर डॉ. दत्त कुंभार यांना संगीतरत्न पुरस्कार याप्रमाणे वरील व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाची नोंद घेऊन न्यूज लाईन सन्मान सोहळा 2023 या कार्यक्रमा गौरव होणार आहे तर आरोग्यासाठी कार्यरत असलेल्या प्रीतिसंगम हास्य परिवार या संस्थेचाही सन्मान होणार आहे.

या कार्यक्रमात प्रेरणादायी व्याख्याते इंद्रजित देशमुख काकाजी यांचे समयोचित मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन न्यूज लाईनचे कार्यकारी संचालक सागर बर्गे, सहसंपादक सुहास कांबळे, सहसंपादक अमोल टकले यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!