google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

जेम्स कॅमेरून करणार राजामौलींसोबत सिनेनिर्मिती..!


एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’या चित्रपटाने यादिवसांत जागतिक स्तरावर नाव कमवत सर्व काळातील सर्वात प्रसिद्ध भारतीय चित्रपटांपैकी एक बनत आहे. दरम्यान, आता या चित्रपटाने हॉलिवूड चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरून यांचेही लक्ष वेधून घेतले, ज्यांनी एसएस राजामौली यांच्याशी संवाद साधत त्यांचे व्हिजन, त्यांची प्रतिभावान स्टोरीटेलिंग आणि त्यांच्या इमोशन्सने भरपूर असलेल्या पात्रांची प्रशंसा केली.


एसएस राजामौली यांच्याशी झालेल्या संभाषणात जेम्स कॅमेरून म्हणाले, “तुमची पात्रे पाहणे ही एक अनुभूती आहे. आणि तुमचा सेटअप आग, पाणी, कथा, एकामागून एक प्रकटीकरण, मग तो जे करत आहे त्याच्या बॅकस्टोरीवरून पुढे जाणे, ट्विस्ट आणि टर्न आणि मैत्री हे खूप शक्तिशाली आहे. आणि मला ही गोष्ट आवडली की तुम्ही सर्व गोष्टी एकत्र दाखवल्या, हा एक फुल शो आहे आणि मला तो आवडला. तुमचा देश आणि तुमच्या प्रेक्षकांना किती अभिमान वाटतो याची मी फक्त कल्पना करू शकतो. तुम्हाला टॉप ऑफ द वर्ल्ड ची भावना वाटली पाहिजे.”


चित्रपटाबद्दल बोलण्याव्यतिरिक्त, कॅमेरूनच्या पत्नी यांनी खुलासा केला कि, त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा पाहिला, ‘अवतार’ आणि ‘टायटॅनिक’च्या दिग्दर्शकाने एसएस राजामौली यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करण्याचे आमंत्रणही दिले. तसेच, दोन प्रतिष्ठित दिग्दर्शकांच्या प्रस्थानापूर्वी जेम्स कॅमेरून पुढे म्हणाले, “आणि आणखी एक गोष्ट… तुम्हाला कधी इथे चित्रपट बनवायचा असेल तर लेट्स टॉक.”


जागतिक बॉक्स ऑफिसवर ₹1,200-₹1,258 कोटींची कमाई करणारा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी भारतीय चित्रपट बनण्याव्यतिरिक्त, एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’या सिनेमाने ‘बेस्ट ओरिजनल सॉंग’साठी भारतातील पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कारही पटकावला. एवढेच नव्हे तर, या ऐतिहासिक चित्रपटाने 28 व्या क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ आणि ‘बेस्ट सॉंग’चे पुरस्कारही जिंकले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!