google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर झाला प्रदर्शित

लव रंजनचा बहुप्रतीक्षित रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर आज एका मेगा इव्हेंटमध्ये रिलीज करण्यात आला असून, याला प्रेक्षकांच्या जबरदस्त प्रतिक्रिया मिळाल्या. या ट्रेलरमध्ये लीड जोडीमधील उत्कृष्ट केमिस्ट्री, उत्कृष्ट व्हिज्युअल्स, उत्तम डायलॉग्स आणि एक संकल्पना पाहायला मिळेल जी आपल्या टायटलप्रमाणेच मजेदार, ट्विस्टने भरपूर आणि रिलेटेबल आहे. अशातच, ‘तू झूठी मैं मक्कार’हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये रोमान्सला 2023च्या शैलीत पुनरुज्जीवित करण्यासाठी सज्ज आहे.

https://bit.ly/TuJhoothiMainMakkaar-Trailer

या चित्रपटाद्वारे पदार्पण करणार्‍या स्टँड-अप किंग अनुभव सिंग बस्सी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करत आपल्या विनोदी वन लाइनर्सने सर्वांचे मनोरंजन केले आणि वर्षातील सर्वात मनोरंजक ट्रेलर लॉन्चसाठी माहोल सेट केला. तसेच, कार्यक्रमादरम्यान जेव्हा ‘झूठी’ श्रद्धा आणि ‘मक्कार’ रणबीर यांनी दिग्दर्शक लव रंजनसोबत स्टेज शेअर केला तेव्हा आपले किस्से सांगत सर्वांचे मनोरंजन केले. तेव्हा असे समजले की चित्रपटाच्या शूटिंगमध्ये जेवढी मजा येते तेवढीच ती पडद्यावर देखील दिसून येते. अशातच, या ट्रेलरमध्ये प्रीतम, अमिताभ भट्टाचार्य आणि अरिजित सिंग यांच्या एकत्र येण्याची जादूसह चित्रपटाच्या सुरेख संगीताची झलकही पाहायला मिळते.

प्रेक्षकांनी एक रिअल युवा रोम-कॉम चित्रपटाची दीर्घकाळ प्रतीक्षा केली आहे आणि ‘तू झूठी मैं मक्कार’या सिनेमाने निश्चितपणे सर्व बॉक्सेसमध्ये टिकमार्क केले आहे. दरम्यान, आता या ट्रेलरने चित्रपटाबद्दलची अपेक्षा वाढवली आहे. अशातच, लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!