उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंना ऑफर?
सातारा (महेश पवार) :
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात नेहमीच या ना त्या कारणाने खटके उडत असतात, एवढेच नव्हे तर कोजागिरी पौर्णिमेला झालेल्या सुरुची राड्यानंतर दोन्ही राजे आमनेसामने आले दोघांमधील वाद विकोपाला गेला.
यानंतर या ना त्या कारणाने दोघांच्यातील धुसफूस वारंवार सुरुच राहिली याचे चित्र सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत देखील पहायला मिळालं. यानंतर बाजार समितीच्या जमिनीवरून दोन्ही राजे आमनेसामने आल्याचे चित्र पहायला मिळाले.
दरम्यान शुक्रवारी खा उदयनराजे हे सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या जॅक वेलच्या भूमिपूजन प्रसंगी आले असताना ते पत्रकारांशी बोलत असताना त्यांना पत्रकारांनी आगामी पालिका निवडणुकीत तुमची भूमिका काय दोघं बसून चर्चा करणार का असं विचारलं असता, उदयनराजेंनी सातारा पालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढण्यासाठी बसून ठरवले पाहिजे. मी तयार आहे पण माझ्याबरोबर कोण बसणार म्हणत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता आगामी पालिका निवडणुकीत एकत्र येण्यासाठी खासदार उदयनराजे यांनी तयारी दर्शवली.
आणि जर कोण नाही आलं तर मी एकटाच बसणार असं म्हणत उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंना आगामी निवडणुकीत एकत्र येण्यासाठी आपली तयारी दर्शवली.यामुळे आता शिवेंद्रराजे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे …. नेमकं उदयनराजे काय म्हणतात पाहूयात.