
स्वत:च्या ‘दरे’वर लक्ष; मात्र जिल्ह्याकडे ‘का’ होतेय मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष?
सातारा (महेश पवार) :
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर जिल्ह्याला झुकते माप देतील अशी अपेक्षा होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी फक्त त्याचं मुळं गाव असलेल्या दरे गावाकडे आणि परिसरातील विकास कामाकडे जास्त लक्ष दिल्याची चर्चा जनमानसात होत आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचे एक ना अनेक दौरे झाले मात्र त्यांनी साताऱ्यात जिल्ह्यांचे ठिकाणी म्हणून सातार्यात एकदाच पाऊल टाकले ते दरे गावी जायला हेलिकॉप्टरला पोषक वातावरण नव्हतं म्हणुन सातारा सैनिक स्कूल ग्राउंडच्या मैदानावर उतरून थेट घरचा रस्ता पकडला आणि दरे गावी गेले. मुख्यमंत्री ज्या ज्या वेळी जिल्हा दौऱ्यावर येतात तेव्हा महाबळेश्वर नाहीतर दरे गावी जिल्ह्याचा आढावा घेतल्याशिवाय जात नाहीत.
मागील आठवड्यात मुख्यमंत्री आले त्यांनी गावाकडे शेतात काम केलं. बांबू लागवड केली. हेलिकॉप्टरमधून भागातील विकासकामांचा आढावा देखील घेतला मात्र त्यांना सातारा जिल्ह्यातील माण खटाव फलटण कोरेगाव सातारा जावळी तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे मात्र तरीही जिल्ह्याचा दुष्काळी यादीत समावेश न झाल्याने शेतकऱ्यांच्या मधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी देखील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली.