‘जाती देवांनी नाही, तर पंडितांनी बनवल्या…’
मुंबई:
‘जाती देवांनी बनवलेल्या नाहीत, जाती पंडितांनी बनवल्या आहेत. देवासाठी आपण सर्वजण एक आहोत आपल्या देशाला वाटून पहिल्यांदा आक्रमण झाली, यानंतर बाहेरुन आलेल्या लोकांनी याचा फायदा घेतला, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले. मुंबईत संत शिरोमणी रोहिदास जयंतीनिमित्त आयोजित एक कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
‘आपल्या समाजात फूट पाडून लोकांनी नेहमीच फायदा घेतला आहे. वर्षापूर्वी देशात आक्रमणे झाली, मग आमच्यात फूट पाडून बाहेरच्या लोकांनी फायदा घेतला. नाहीतर आमच्याकडे बघायची हिम्मत कोणाची नव्हती. याला कोणीही जबाबदार नाही. समाजातील आपुलकी संपली की स्वार्थ आपोआप मोठा होतो’,असंही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले.
मोहन भागवत पुढे म्हणाले की,’देशात हिंदू समाज नष्ट होण्याची भीती आहे का? हे तुम्हाला कोणताही ब्राह्मण सांगू शकत नाही, तुम्ही समजून घ्या. आपली उपजीविका म्हणजे समाजाप्रती जबाबदारी आहे. प्रत्येक काम समाजासाठी असते, मग कोणी उच्च, नीच, वेगळे कसे झाले?
‘देशात विवेक आणि चैतन्य यात फरक नाही. फक्त लोकांची मते वेगळी असतात. आम्ही धर्म बदलण्याचा प्रयत्न केला नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत की, “धर्म बदलला तर परिस्थिती कशी बदलायची हे सांगितलं आहे, असंही मोहन भागवत म्हणाले.
‘कोणत्याही परिस्थितीत तुमचा धर्म सोडू नका. संत रोहिदासांसह सर्व विचारवंतांची म्हणण्याची पद्धत वेगळी होती, पण त्यांनी सांगितले की, नेहमी धर्माशी जोडले जा. हिंदू आणि मुस्लिम सर्व समान आहेत, असंही मोहन भागवत म्हणाले.