सातारा
विहे येथे क्रूझर कोसळली विहिरीत…
कराड (महेश पवार) :
कराड- चिपळूण रोडवर विहे गावच्या हद्दीत रस्त्याकडेला असलेल्या विहीरीत क्रूजर गाडी कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या क्रूझरमध्ये किती लोक होते याची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलिसांसह प्रशासनाकडून सुरू होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील विहे गावच्या हद्दीत रस्त्याकडेला कुंभारकी नावाचे विहीर आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास क्रूझर चालक मल्हारपेठहून कराडच्या दिशेने येत होता. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विहे गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा क्रूझरवरील ताबा सुटल्याने विहीर रस्त्याकडेला असलेल्या विहीरीत सुमारे 25 ते 30 फूट खोल पाण्यात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ पोलीस पाटील यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.
https://www.instagram.com/reel/CuAEgZkBDYJ/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==
घटनेचे गांभीर्य ओळखून मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांच्यासह पोलीस कर्मचारी, प्रांताधिकारी सुनिल गाढे, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच तसेच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून विहिरीतून क्रुझर गाडी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान ही घटना पाहण्यासाठी विहे व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गाडीमध्ये किती लोक होते याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही.