महाराष्ट्र

‘कारवाई सूडबुद्धीने, कोणत्याही चौकशीला तयार’

मुंबई :
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीने गुरूवारी छापेमारी केली. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास अनिल परब यांची १३ तास मॅरेथॉन चौकशी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीनंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दापोली येथील साई रिसॉर्ट चालू नसताना केंद्रीय पर्यावरण विभागाकडून खोटा गुन्हा दाखल केला गेला. आजची चौकशी फक्त रिसॉर्टविषयी होती. परंतु सूडबुद्धीने ही कारवाई सुरु होती, कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.

आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या निवासस्थानावर तसेच माझ्याशी संबंधित काही लोकांवर छापे मारले. गेल्या काही दिवसांपासून या बातम्या सतत येत होत्या. ईडीची कारवाई होणार, अशा बातम्या सातत्याने कानावर पडत होत्या. यामागील गुन्हा तपासला असता असे लक्षात आले, दापोली येथील साई रिसॉर्ट, जे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहेत, याचे मालक सदानंद कदम आहेत. याचा मालकी हक्क त्यांनी सांगितला आहे, असे अनिल परब म्हणाले.

याबाबत कोर्टातही दावा केला आहे. सदानंद कदम यांनी खर्चाचे सर्व हिशोब आयकर विभागाला दिले, हे सगळे असताना हे रिसॉर्ट अजून पूर्ण झालेले नाही. असे असताना पर्यावरणाची दोन कलमे लावून या रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रात जाते, अशा प्रकारचा चुकीचा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली पोलिसांत दाखल केला आहे, असे अनिल परब यांनी सांगितले.

याचबरोबर, जे रिसॉर्ट सुरूच नाही आहे, ज्याच्याबद्दल प्रदुषण महामंडळाने रिपोर्ट दिला आहे. तसेच, पोलिसांनी सुद्धआ रिपोर्ट दिला आहे की रिसॉर्ट सुरू नाही. तरी देखील माझ्या नावाने, साई रिसॉर्टच्या नावाने नोटीस काढली गेली, तक्रार दाखल केली गेली. त्याला प्रेडिगेटेड ऑफेन्स समजून ईडीने माझ्यावर छापेमारीची कारवाई केली. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे अनिल परब म्हणाले.

बंद रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात कसे जाईल. या सर्व गोष्टींचा खुलासा कोर्टात होईल, चौकशीअंती सगळे सत्य समोर येईल. मी चौकशीला पुढे गेलो आहे आणि यापुढेही मी चौकशीला जाईल. मी प्रत्येक गोष्ट कायद्याला पुढे ठेवून बघतो, त्यामुळे मला माहीत आहे. कायद्यानुसार काय होऊ शकते, काय होऊ शकत नाही, त्यामागील काय अर्थ काढायचे ते वेळ आल्यावर पाहू. सर्व गोष्टींचा खुलासा कोर्टात देईल, असेही अनिल परब यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
%d bloggers like this: