google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

जिल्हा शासकीय गोदामातील हमाल सहा महिने विनापगार

सातारा:

सातारा शहरातील पोवई नाका येथे असलेल्या शासकीय गोदामात रेशनच्या धान्याच्या भरणी-उतरणीसाठी असणार्या हमालानवरच उपासमारीची वेळ आली आहे . गेले सहा महिने झाले पगार नसून याकडे कोणीही लक्ष देत नाही , जो हमाल गरिबांच्या घराची चुल बंद होऊ नये म्हणून स्वतः च्या डोक्यावर ओझे वाहून धान्य पुरवतो त्याच हमालावर सहा महिने पगार न झाल्याने उपासमारीची वेळ आली , यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने याकडे लवकरात लवकर लक्ष घालणं गरजेचे आहे.


जिल्ह्यातील गोरगरिबांचा सरकारी कोट्यवधी रुपयांचा खजिना भगवान भरोसे , ना सुरक्षा रक्षक ना सिसिटिव्ही ना सफाई कामगार सगळं फक्त हमालाच्या भरोस्यावर . तसेच परिसरातील धान्याच्या गाड्या मधील धान्य चोरी जाण्याची शक्यता आहे . परिसरात मद्यपीचा अड्डा बनला असून जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघन गरजेचे आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!