
अॅक्सिस बँक, व्हिसाची सणासुदीसाठी विशेष मोहीम
मुंबई : अॅक्सिस बँक आणि व्हिसा यांनी सणासुदीच्या खरेदीसाठी ‘दिल से ओपन सेलिब्रेशन्स २०२६’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, प्रवास आणि जीवनशैलीसह विविध क्षेत्रांत १०० हून अधिक ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या मोहिमेच्या जाहिरातीत अभिनेता शाहिद कपूर आणि एका लहान मुलीच्या जादुई डॉलहाऊसची कथा दाखवण्यात आली आहे. दैनंदिन जीवनातील छोट्या इच्छा सणासुदीच्या काळात मोठ्या आनंदात कशा रूपांतरित होऊ शकतात, ही संकल्पना त्यातून मांडण्यात आली आहे. जाहिरातीसाठी अमित त्रिवेदी यांनी मूळ संगीत दिले आहे.
या ऑफर्समध्ये एलजी, सॅमसंग, सोनी, बर्बेरी, बॉस, कोच, मेक माय ट्रिप, इक्सिगो, एअर इंडिया, विवो आणि ओप्पो यांसारख्या ब्रँड्सचा समावेश आहे. व्हिसा नेटवर्कवरील पात्र अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डधारकांना खरेदी आणि ईएमआय व्यवहारांवर २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते. ऑफर्ससाठी संबंधित अटी व पात्रता लागू असतील.
ही डिजिटल-केंद्रित मोहीम सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म, आउटडोअर जाहिराती, एटीएम केंद्रे आणि अॅक्सिस बँकेच्या शाखांमधून राबवण्यात येणार आहे.





