google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘अपर्णा एंटरप्रायझेस’चा ‘अल्टेझा’ या ब्रँडसह गोव्यात प्रवेश

पणजी :

भारतातील बांधकाम साहित्य उत्पादकांपैकी सर्वात वेगाने वाढणाऱ्या अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) या कंपनीने गोव्यात आपल्या उच्च दर्जाच्या अॅल्युमिनिअम खिडक्या आणि दरवाजांचा “अल्टेझा” हा ब्रँड सादर करीत असल्याची घोषणा केली आहे. पश्चिम भारतात विस्तार करण्याची या कंपनीची योजना आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि विदर्भ या महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये यशस्वी प्रवेशानंतर गोव्यातील हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

सध्या ६.१६ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढ्या किमतीच्या आणि २०३१पर्यंत ९.३९ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असलेल्या भारताच्या लक्झरी फेनेस्ट्रेशन क्षेत्रात (खिडक्या-दरवाज्यांची सजावटीची बाजारपेठ) अल्टेझा ब्रॅंडला अधिक वाटा मिळवण्यासाठी गोव्यात टाकलेले पाऊल महत्त्वाचे आहे. गोव्यातील उच्च दर्जाच्या निवासी प्रकल्पांमध्ये वाढ आणि हवामानाला तोंड देणाऱ्या, आकर्षक बांधकाम साहित्याची वाढती मागणी यामुळे अल्टेझाच्या विस्तारासाठी हे ठिकाण अत्यंत उपयुक्त ठरत आहे.


या उपक्रमासाठी ‘एईएल’ने ‘पिलांको’ या ब्रँडबरोबर भागीदारी केली आहे. पिलांको हे ‘पिळणकर इंडस्ट्रीज अँड डेव्हलपर्स एलएलपी’चे एक युनिट असून नागरी बांधकाम व पायाभूत बांधकामाच्या क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेली ती एक विश्वासार्ह संस्था आहे. या भागीदारीअंतर्गत, गोव्यात मध्यवर्ती ठिकाणी एक अत्याधुनिक अल्टेझा एक्सपीरियन्स स्टुडिओ सुरू करण्यात आला आहे.


या स्टुडिओची रचना नवोन्मेष केंद्र म्हणून करण्यात आली असून, ग्राहक, आर्किटेक्ट्स आणि बांधकाम व्यावसायिकांना अल्टेझाचे हवामान-प्रतिरोधक अॅल्युमिनिअम सिस्टिम्स येथे प्रत्यक्ष पाहता आणि अनुभवता येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. स्लायडिंग, फोल्डिंग, लिफ्ट अँड स्लाईड तसेच कॅसमेंट सिस्टम्स यांची प्रात्यक्षिके येथे पाहायला मिळतात. याशिवाय, आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत अशी स्मार्ट होम इंटिग्रेशनसाठी सुसज्ज यंत्रणाही येथे उपलब्ध आहे. ग्राहकांसाठी व्यक्तिगतरित्या सल्लामसलत करता येईल असे कन्सल्टेशन लाऊंज येथे आहे. सोबतच प्रशस्त पार्किंग व्यवस्था आणि सुलभ पोहोच यामुळे सर्व प्रकारच्या भेट देणाऱ्यांना हा स्टुडिओ एक सुलभ आणि सुसंगत अनुभव देतो.


‘अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेड’च्या कार्यकारी संचालिका अपर्णा रेड्डी म्हणाल्या, “गोवा आता केवळ एक पर्यटनस्थळ किंवा आणखी एखादे घर असण्याचे ठिकाण राहिलेले नाही, तर समकालीन आणि शाश्वत जीवनशैलीचा ते एक केंद्रबिंदू बनत चालले आहे. येथील पायाभूत सुविधांचा विकास, तसेच उच्च अभिरुची असलेले ग्राहक आणि त्यांच्यातील कला-संवेदनशीलता यांमुळे या राज्यात प्रिमियम दर्जाच्या बांधकामांच्या उभारणीसाठी मोठी संधी आहे. ‘अल्टेझा एक्सपीरियन्स स्टुडिओ’च्या उद्घाटनाच्या निमित्ताने आम्ही गोव्यातील या परिवर्तनात सहभागी होत आहोत. आमच्या अत्याधुनिक, गंजरोधक अॅल्युमिनिअम सिस्टिम्सच्या माध्यमातून, कार्यक्षमता व सौंदर्य यांचा समतोल साधणाऱ्या खिडक्या व दरवाज्यांची गरज पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गोव्यातील वास्तुशिल्पाच्या प्रवासात आपले योगदान देत, वाढत्या रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्रासाठी मूल्यनिर्मिती करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”


‘अल्टेझाचे’ व्यवसायप्रमुख अमर देशपांडे म्हणाले, “गोवा हे लक्झरी रिअल इस्टेट आणि आधुनिक वास्तुकलेचे केंद्र म्हणून वेगाने विकसित होत असून, ‘अल्टेझा’च्या प्रीमियम उत्पादनांसाठी हे एक नैसर्गिक व योग्य ठिकाण आहे. पिलांकोसोबतच्या आमच्या भागीदारीमुळे आम्हाला स्थानिक बाजारपेठेची सखोल समज आली आहे. त्यामुळे आम्हाला अंमलबजावणीत उत्कृष्टता साधता येत आहे. गोव्यातील ग्राहकांना त्यांच्या विशिष्ट वास्तुशास्त्रीय गरजांसाठी योग्य सोल्यूशन्स आमच्याकडे मिळू शकतात. नवीन पिलांको-अल्टेझा एक्सपीरियन्स स्टुडिओ ही केवळ उत्पादनांची झलक दाखवणारी जागा नसून, ही एक संवेदनशीलपणे आखलेली जागा आहे, जिथे घरांचे मालक, आर्किटेक्ट्स आणि डेव्हलपर्स अल्टेझाची हाय परफॉर्मन्स अॅल्युमिनिअम सोल्यूशन्स प्रत्यक्ष पाहू शकतात, अनुभवू शकतात व आपापल्या गरजेनुसार सानुकूल करू शकतात. स्मार्ट, आधुनिक आणि शाश्वत जीवनशैली शोधणाऱ्यांसाठी हे ठिकाण एक परिपूर्ण अनुभव देणारे गंतव्यस्थान आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!