google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

शादी डॉट कॉम, नोकरी डॉट कॉम, कुकू आणि इतर भारतीय अ‍ॅप्सना का दिला गुगलने दणका?

गुगलने पुन्हा एकदा काही अॅप्सना बॅन केले आहे. प्ले स्टोअरच्या या अॅप्समध्ये भारतीय अॅप्स असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये Shaadi.com, Naukri.com, 99 एकर यासांरख्या मोठ्या साइट्सचा समावेश आहे.


मागच्या वर्षी कंपनीने काही अॅप डेव्हलपर्सना याबाबत इशारा दिला होता. काही अॅप्सच्या गुगलच्या बिलिंग धोरणांमध्ये अयशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. यानंतर त्यांना कंपीने इशारा दिला आहे. यावेळी गुगलने (Google) १० अॅप्सवर कारावाई केली आहे. तसेच प्ले स्टोअरवरुन काढून टाकण्यात आले आहे. परंतु, अद्याप गुगलने या अॅप्सची यादी जाहीर केलेली नाही.

गुगलने काही अॅप्सवर कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार Kuku FM, Bharat Matrimony, Shaadi.com, Naukri.com, 99 acres, Truly Madly, Quack Quack, Stage, ALTT (Alt Balaji)आणि इतर दोन महत्त्वाच्या अॅप्सवर (Application) बंदी (Banned) घालण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपन्यांनी दिलेल्या मुदतीत सेवा शुल्क न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. गुगलच्या प्ले स्टोअरवरून या अॅप्सना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक स्टार्टअप्स कंपनीचे असे मत होते की, गुगलने शुल्क आकारू नये आणि त्यामुळे त्यांनी पेमेंट केले नाही.

हे प्रकरण सध्या कोर्टात गेल्यामुळे अॅप्सना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. तसेच स्टार्टअप कंपनीला शुल्क भरण्यात सांगण्यात आले आहे. न भरल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, कुकु एफएमचे सीईओ लालचंद बिशू यांनी X (Twitter) वरुन गुगलवर टीका केली आहे. त्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. तसेच Naukari.com आणि 99 acres चे संस्थापक संजीव बिखचंदानी यांनी देखील पोस्ट करुन गुगलवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. या भारतीय अॅप्सना पुन्हा प्लेस्टोअरवर संधी मिळेल का, याविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही.

..

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!