google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

Karanataka election results: ‘…हा विजय महाराष्ट्रासह देशाला दिशादर्शक ठरेल’

वडुज:

सर्वसामान्यांना झळ पोहचवणाऱ्या महागाई ,बेकारी व शेतीमालास कवडीमोल दर यामुळे जनतेतून मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड उग्रेक आहे . कर्नाटक विधानसभा निवडणूकीतील कॉंग्रेसचा विजय आगामी निवडणूकांसाठी निश्चितच महाराष्ट्रसह देशाला दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरचिटणीस व हरणाई उद्योग समुहाचे संस्थापक रणजीतसिंह देशमुख यांनी केले.

कर्नाटक विधानसभा निवड्णूकीतील काँग्रेसच्या दणदणीत विजयाचा आनंदोत्सव वडूज ता . खटाव येथील आयलँड चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी व जिलेबीचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रणजीतसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यानी आनंदोत्सव साजरा केला .राष्ट्रीय कॉंग्रेसचा विजय असो .. , राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है .. , देशका नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो .. , आ .पृथ्वीराज चव्हाण , आ सतेज पाटील ,रणजीतभैय्या देशमुख आगे बढोच्या घोषनांनी परिसर दुमदुमून गेला. तसेच परिसरात पेढे व जिलेबीचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना रणजीतसिंह देशमुख म्हणाले की , कर्नाटकच्या सीमा भागातील काही जिल्ह्यांची जबाबदारी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासह माजी मत्री विश्वजीत कदम व आम्हां कार्यकर्त्यावरती विशेष जबाबदारी सोपविली होती. मतदारापर्यंतचा थेट जनसंपर्क , प्रचारसभा , रॅली, कोपरासभा , प्रचाराचे सुक्ष्म नियोजना बरोबरोच जनतेमधील भाजपा च्या विरोधातील असंतोषाचा उग्रेक आणि राहुल गांधी यांचा आशावादी चेहरा या सर्वांचा परिपाक म्हणजेच कर्नाटकमधील काँग्रेस पक्षाचा विजयी एल्गार दिसून येत आहे. महाराष्ट्रासह देशातील आगामी निवडणूकामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेक्ष पक्षाच्या विजयाची घौडदौड अशीच कायम राहिल असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला .

यावेळी तालुकाध्यक्ष डॉ . संतोष गोडसे , माण युवकचे तालुकाध्यक्ष अँड. संदीप सजगणे ,माण विधानसभा मतदार संघाचे डॉ . महेश गुरव , नगरसेवक अभय देशमुख, माकॅट कमेटीचे संचालक विजय शिंदे , युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे , अँड पी. डी . सांवत आलीम मोदी , राहुल सजगणे , नितीन बुरुंगले , बागवान , ज्ञानेश्वर इंगवले , निलेश घार्गे , सुरेश लंगडे आदि सह बहुसंख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!