महाराष्ट्रसातारा
पुसेसावळीत दोन गटातील राड्यानंतर तणावपूर्ण शांतता
सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 3 दिवस बंद राहणार
साताऱ्यातील पुसेसावळी येथे रात्री उशिरा झालेल्या दोन गटातील राड्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे. सातारा जिल्ह्यात पुढील तीन दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या सर्व घटनेनंतर खटाव तालुक्यातील काँग्रेसचे नेते अखिल भारतीय काँग्रेस सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी कराड मधील कृष्णा रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली तसेच सर्वांना शांतता राखण्याचा आवाहनही त्यांनी केलं.