google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘हे’ आहे रणबीर-श्रद्धाच्या नव्या सिनेमाचे नाव

लव फिल्म्सने अलीकडेच आपल्या आगामी चित्रपटाच्या शीर्षकाचा एक टिझर प्रदर्शित केला ज्यामध्ये दर्शकांना रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत आगामी चित्रपटाच्या शीर्षकाची झलक पाहायला मिळाली. तसेच, निर्मात्यांनी या टिझरमध्ये शीर्षकाच्या “TJMM”या इनीशियल्सचे अनावरण केले होते, त्यामुळे दर्शकांमध्ये चित्रपटाचे शीर्षक काय असेल यावरून उत्कंठा वाढत असतानाच निर्मात्यांनी अखेरीस या चित्रपटाचे टायटल रिलीझ केले आहे.

अशातच, लव फिल्म्सने रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत आगामी चित्रपटाचे टायटल ‘तू झूठी मैं मक्कार’चे अनावरण केले आहे. तसेच, प्रीतमद्वारा म्युजिक आणि अमिताभ भट्टाचार्यद्वारा लिरिक्सकडे इशारा करताना, व्हिडिओचे शीर्षक रणबीर आणि श्रद्धा यांच्यातील मजेदार केमिस्ट्रीची ओळख करून देते.

टायटल व्हिडिओमध्ये श्रद्धा आणि रणबीर कपूर यांनी साकारलेल्या ‘झूटी’ आणि ‘मक्कार’ या पात्रांसह चित्रपटाच्या खोडकर जगाची झलक पाहायला मिळते. अशातच, चित्रपटाच्या या मजेशीर शीर्षकावरून असे म्हणता येईल की हा चित्रपट प्रेक्षकांसाठी केवळ खूप मजा आणण्याचे आश्वासन देत नाही तर 2023 मध्ये प्रेम आणि रोमान्सचा एक पूर्णपणे नवीन अनुभव देखील सादर करेल.


पिकेपी (PKP), एसकेटीकेएस (SKTKS), डीडीपीडी (DDPD) नंतर आता दर्शकांना टीजेएमएम “TJMM”कडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि चित्रपटाचे शीर्षक पाहता हा चित्रपट त्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल असे वाटते.

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झुठी मैं मक्कार’या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!