google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

आर. माधवन FTII चा नवा प्रमुख…

R Madhavan : अभिनेता आर. माधवन हा आता FTII चा नवा अध्यक्ष असणार आहे. आर. माधवनला नॅशनल फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था (FTII) च्या अध्यक्षपदी माधवनची निवड झाली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे आणि आ’र. माधवनचं अभिनंदनही केलं आहे. आर. माधवनच्या ‘रॉकेट्री द नांबी इफेक्ट’ या सिनेमाला नुकतंच सर्वश्रेष्ठ सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.

आर. माधवन हा हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला एक नावाजलेला अभिनेता आहे. त्याने आत्तापर्यंत विविध हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच कन्नड सिनेमातही त्याने काम केलं आहे. १९९७ मध्ये आलेल्या इन्फर्नो या इंग्रजी सिनेमातून त्याने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. हिंदी, तमिळ या सिनेमांमध्ये उत्तम अभिनय करुन माधवनने त्याचा असा खास चाहता वर्ग तयार केला आणि तो टिकवलाही. राजू हिरानी यांच्या ‘थ्री इडियट्स’मध्येही तो झळकला होता. तर ‘रहना है तेरे दिल मे’ सिनेमातला त्याचा रोल प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहे.

एका मुलाखतीत माधवनने हे सांगितलं होतं की मी हिंदी आणि तमिळ दोन्ही भाषा चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. त्यामुळेच मी या दोन्ही भाषांच्या सिनेमांमध्ये काम करु शकलो. माधवनने बीएससी इलेक्ट्रॉनिक्स केलं आहे. त्याच्या आई वडिलांना वाटत होतं की माधवनने इंजिनिअर व्हावं. मात्र माधवनने पब्लिक रिलेशन्स हा विषय घेऊन एम. ए. केलं. कोल्हापुरात तो स्पिकिंग कोर्सेसही घ्यायचा. त्याचा हा फॉर्म्युला तेव्हा खूप हिट झाला होता. मुंबईत आल्यानंतर त्याने मॉडेलिंग केलं. त्यानंतर सीरियल्समध्येही काम केलं. त्यानंतर तो सिनेमा करु लागला. थ्री इडियट्सच्या फरहानची आणि माझी गोष्ट काही प्रमाणात मिळती जुळती आहे असंही माधवनने सांगितलं होतं. हाच माधवन आता FTII चा अध्यक्ष झाला आहे. ज्यानंतर आता त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

‘रहना है तेरे दिल में’, ‘रंग दे बसंती’, ‘गुरु’, ‘तनु वेड्स मनु’, ‘रॉकेट्री द नंबी इफेक्ट’ या आणि अशा एकाहून एक सरस सिनेमांमध्ये माधवनने विविधरंगी भूमिका साकारल्या. गुरु सिनेमातला त्याचा शाम सक्सेना हा पत्रकार अद्यापही लोकांच्या लक्षात आहे. रहना है तेरे दिलमें सिनेमातलं त्याचं ‘मॅडी’ हे नाव त्याला चिकटलं ते कायमचंच. एवढंच नाही तर ९० च्या दशकात आलेल्या ‘साया’, ‘सी हॉक्स’, ‘बदलते रिश्ते’, ‘ये कहाँ आ गये हम’ या हिंदी मालिकांमध्येही माधवन झळकला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!