google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

थलपथी विजयच्या ‘वरिसु’चा जगभरात डंका…

थलपथी विजयचा ‘वरिसु’ (varisu) चित्रपट ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. गेली अनेक महिन्यांपासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. इमोशनल फॅमिली ड्रामा आणि ॲक्शन यांचे मिश्रण असलेल्या या चित्रपटात विजय पुन्हा एकदा पूर्वीच्या अंदाजात दिसून येत आहे. आता या चित्रपटाने जगभरातून मोठाच गल्ला जमवला आहे.

चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ट्विटरवरही प्रतिक्रिया देत प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. प्रदर्शनाच्या तीन दिवसातच या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरातून १०३ कोटींची कमाई केली. त्यामुळे ‘वरिसु’ १०० कोटींचा आकडा पार करणारा थालापती विजयाची दहावा चित्रपट ठरला आहे.

वामशी पेडिपल्ली दिग्दर्शित Varisu या चित्रपटात थलपथी विजय एका व्यावसायिकाच्या मुलाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपटगृहात इतर चित्रपटांना चांगलीच टफ फाईट देताना दिसत आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!