google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

वाढत्या अपघातांवर काँग्रेसची भाजप सरकारवर टीका

पणजी:

गोव्याचे एआयसीसी मीडिया प्रभारी हर्षद शर्मा यांनी शनिवारी राज्यातील वाढत्या रस्ते अपघात आणि गुन्ह्यांसाठी भाजप सरकारवर टीका केली. शर्मा यांनी शनिवारी काँग्रेस हावस येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, भाजप सरकारने रस्ते अपघात रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विजय भिके, वीरेंद्र शिरोडकर उपस्थित होते.

“2023 मध्ये सुमारे 532 लोकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षी 2800 हून अधिक अपघात झाले. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 98 अपघात झाले. मात्र भाजप सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. गेल्या 16 दिवसांत रस्ते अपघातात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही चिंतेची बाब आहे,”असे शर्मा म्हणाले.

ते म्हणाले की, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवले जात नाही आणि सरकार सुरक्षितता देण्यात अपयशी ठरले आहे.
“जुन्या मांडवी पुलावर झालेला अपघात, ज्यात दुचाकीस्वार नदीत पडला, ही घटना सरकारने तातडीने हाताळायला हवी होती. मोटारसायकल स्वाराचा मृतदेह शोधण्यासाठी त्यांना दोन दिवस लागले. पुलाच्या रेलिंगची उंची वाढवण्यातही सरकारला अपयश आल्याने असे अपघात घडत आहे ,” असे शर्मा म्हणाले.

भिके म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. “राज्यात बलात्कार, विनयभंग, चोरी, अंमली पदार्थांच्या कारवाया वाढल्या आहेत. तरीही मुख्यमंत्री प्रमोद सावंत सुरक्षेची बढाई मारतात. सुरक्षितता कुठे आहे,” असा सवाल त्यांनी केला.
“हे सरकार फक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आणि त्यातून पैसे कमवण्यात व्यस्त आहे. रस्ते अपघातात तरुणांना जीव गमवावा लागत आहे. पण वाहतुक मंत्री मॉविन गुदिन्हो बेजबाबदार विधाने करत आहेत,” असे भिके म्हणाले. महसुलाच्या नावाखाली जनतेची लूट केली जाते, मात्र जनतेला सुरक्षितता देण्यात सरकार अप यशी ठरले आहे, असेही ते म्हणाले.

जनतेच्या हिताचे काम न केल्याने वाहतुक मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. भिके म्हणाले की, अनेक ठिकाणी ‘ट्रॅफिक सिग्नल’ नीट काम करत नाहीत आणि असंवेदनशील सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!