google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीलेख

 क्रिप्टो, शेअर बाजार आणि सोनेः कशात करावी गुंतवणूक?

  • विराज व्यास

बाजारातील मालमत्तांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू आहे. गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असल्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय घेणे एक मोठा चिंतेचा विषय ठरला आहे. सोन्याची पारंपरिक झळाळी कायम असली तरी बिटकॉइनसारख्या क्रिप्टो मालमत्तांनी मागील काही वर्षांत बाजारात मोठी खळबळ उडवली आहे. त्याचबरोबर शेअर बाजारदेखील एक आकर्षक गुंतवणुकीची संधी म्हणून आपले स्थान टिकवून आहे. मालमत्ता वर्गांमध्ये कर्जरोखे, म्युच्युअल फंड्स, रिअल इस्टेट, कमॉडिटीज यांचा समावेश असून ही यादी वाढत जाते. आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जास्त फायदा देणारी गुंतवणूक कशा प्रकारे करावी. याचे प्रमुख उत्तर म्हणजे धोका कमी करून स्थिर परतावे देणारे सुयोग्य मालमत्ता वर्ग राखून ठेवणे.

क्रिप्टो:
क्रिप्टोकरन्सी मागील दहा वर्षांमध्ये एक महत्त्वाचा मालमत्ता वर्ग ठरला आहे. जास्त धोका आणि जास्त परताव्याची क्षमता असलेला हा एक चढउतार होणारा मालमत्ता वर्ग आहे. उदाहरणार्थ, मागील काही महिन्यांत एकाच ट्विटमुळे त्याचे मूल्य २० टक्क्यांनी वाढते आणि कोणतेही कारण नसताना ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते हे आपण पाहिले आहे. बिटकॉइन हा एक अत्यंत लोकप्रिय मालमत्ता घटक असून त्याची सुरूवात एक अमेरिकन डॉलरपेक्षा कमी किंमतीत झाली पण तो आज २२ हजार डॉलर्सपेक्षा जास्त आहे. हा मालमत्ता वर्ग भाकितात्मक गुंतवणूक शोधू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे. तो नवीन युगाच्या गुंतवणूकदारांमध्ये आणि विशेषतः मिलेनियल्समध्ये हळूहळू लोकप्रिय होऊ लागला आहे. भारतात त्याच्या कायदेशीर दर्जाबाबत सातत्याने अंदाज बांधले जातात. परंतु सरकारने क्रिप्टोचे नियमितीकरण करण्याचे उद्दिष्ट दाखवले आहे आणि मालमत्ता वर्गातील त्याचे प्राबल्य कालांतराने दिसून येईल. सध्या त्यावरील कर ३० टक्के आहे.

शेअर्स:
भारतात शेअर बाजारातील रिटेल सहभाग हा सातत्याने सर्वोच्च राहिला आहे. जागतिक साथ, जागतिक संकट आणि चलनवाढीच्या सुरूवातीच्या चिन्हांनी धक्का दिल्यानंतरही बाजारातील इंडेक्स हे सरासरीपेक्षा वर राहिले आहेत. अमेरिकन चलनाची छपाई सध्या सुरू असल्यामुळे समभागांतील गुंतवणूक सकारात्मक राहिली आहे. त्याचबरोबर शेअर बाजारातील व्यवहारांचा खर्च इतर मालमत्ता वर्गांच्या तुलनेत खूप कमी आहे. उदाहरणार्थ, एक समभाग खरेदी करण्यासाठी २५ पैसे इतका कमी खर्च येऊ शकतो तर रिअल इस्टेट खरेदी करण्यासाठी मालमत्ता मूल्याच्या ५-७ टक्के खर्च येऊ शकतो. बाजारातील सध्याच्या आलेखानुसार पुढील दहा वर्षांत जवळपास सर्व मालमत्ता वर्ग वाढतील. परंतु समभागांची कामगिरी इतर गुंतवणुकींच्या तुलनेत जास्त असेल. समभागांनंतर सोने हा आणखी एक असा मालमत्ता वर्ग आहे, जो पुढील काही वर्षांत वाढू शकेल.

सोने:
सोने हा जगातील सर्वात जुन्या राखीव चलनांपैकी एक आहे. ही एक पारंपरिक मालमत्ता आहे, जी मागील अनेक वर्षांपासून गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्य दिलेली आहे. मागील दशकात कर्ज म्युच्युअल फंड्सनी एक गुंतवणूक म्हणून सोन्यापेक्षा उत्तम कामगिरी केली. तथापि, आपण पुढे जात असताना बाजारात वेगळे चित्र पाहायला मिळते. पुढील काही वर्षे ही सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी उत्तम असतील. सोन्याचे मूल्य २०३० पर्यंत ३००० डॉलर्स प्रतिऔंस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांचे कर्ज म्युच्युअल फंड्स असतील आणि मुदत ठेवी असतील त्यांनी पुढील दहा वर्षांत चांगल्या परताव्यांसाठी सोन्याचा विचार करावा.

ज्या गुंतवणूकदारांची कर्ज म्युच्युअल फंड्स, बॉन्ड्स आणि मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे त्यांनी पुढील कालावधीत सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करावा. मागील कालावधीत या मालमत्ता वर्गांनी चांगला परतावा दिला असला तरी त्यांचा व्याजदर न्यूट्रल राहील किंवा तो भविष्यात कमी होईल. ग्लोबल बॉन्डमधील बुल रन आता संपुष्टात येऊ लागला आहे. १९८१ मध्ये यूएस फेडमधील व्याजदर हे सुमारे १२-१३ टक्के होते. तथापि, २०३० दशकाच्या शेवटापर्यंत व्याजदर सुमारे २-३ टक्के आहे. व्याजदर आणि बॉन्डच्या किंमतीतील संबंध म्हणजे व्याजदरात घट झाल्यामुळे बॉन्डच्या बाजारपेठेतील किंमतीत वाढ होते. त्यामुळे पारंपरिक मालमत्ता वर्गात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीवरील अधिक चांगल्या परताव्यासाठी सोन्याचा पर्याय निवडावा.​​

 

(लेखक आशिका ग्रुपचे टेक्निकल अॅण्ड डेरिव्हेटिव्ह्जचे अॅनालिस्ट आहेत. )

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!