google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
लेख

‘बोली मन्ही अहिराणी, जशी दहिमान लोणी…’

मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने २५ फेब्रुवारी २०२४ ला नेर – धुळे येथे झालेल्या अखिल भारतीय सातव्या अहिरानी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देवरे यांनी केलेल्या मूळ अहिराणीतील अध्यक्षीय भाषणाचे अतिसंक्षिप्त शब्दांकन…

अहिरानी भाषाना जागरकर्ता बलायेल बठ्ठा पावना, अहिरानी बोलनारा, अहिरानीवर प्रेम करनारा आनि बिगर अहिरानी आशीसनबी अहिरानी आयकनारा सगळा भाऊबहीनीस्ले राम राम. आख्खा जगमा अंदाजे ६००० बोलीभाषा शेतीस. भारतमा अंदाजे १५०० ते महाराष्ट्रमा ६५ बोलीभाषा शेतीस. भाषाना अभ्यास करता करता ती भाषा, भाषिक कुटुंबं, भाषास्ना येरानयेरसांगे संबंध, पगडा, चालीरीती देवानघेवान आशी गंजनच माहिती भाषास्नी मिळस.
अहिरानी भाषा म्हंजे अभिर लोकस्नी भाषा. अभिरपशी अहिर जयं. आनि अहिरस्नी भाषा ती अहिरानी. ह्या अभिर-अहिर लोक म्हंजे कोन? हाऊ इतिहास आपुले माहीत शे.
आजना धुळा आनि जळगाव जिल्हा आगोदरले येकच व्हता. याले खान्देश म्हनेत. (खान्देशमा आजना नाशिक जिल्हा मजारला बागलाण, मालेगाव, नांदगाव, देवळा, कळवण ह्या तालुकाबी इयेत. १८६९ ले हाऊ भाग इंग्रजसनी नाशिक जिल्हाले जोडा. हायी ध्यानमा घीसन आज खान्देशना इचार कराकर्ता आगोदरना सगळा खान्देश डोळासमोर ठेवना पडई.) १९०६ सालले खान्देशना दोन भाग जयात. धुळाना भाग हाऊ पश्चिम खान्देश आनि आजना जळगाव जिल्हा पूर्व खान्देश. महाराष्ट्र राज्य तयार व्हताच म्हंजे १९६० ले जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा जयात.
पूर्वीसले बागलाण हाऊ मोठा प्रांत व्हता. ह्या प्रांतमा इ. स. ना १७०० या कालखंड पावत बागूल राजानी राजवट व्हती. आगोदर राजवटना नाववरतीन त्या भागले वळखेत. म्हनीसन बागूल राजवटना भाग तो बागलाण नावखाल लोक वळखा लागात. आनि बागलानमा जी भाषा बोलतंस ती बागलाणी. बागलाण- बागलाणी ह्या नावं इ. स. १३०० तीन जुना व्हतीन. संत ज्ञानदेवनी १२ वा शतकमा ‘बागलाण नवरीना अभंग’ लिह्यात. इ. स. १३०० पशी बागूल राजास्नी नामावली सापडी ऱ्हायनी तरी त्याना आगोदरपशी बागलाणमा बागूलस्न राज्य व्हयी. आते हायी बागलाणी भाषा अहिरानी शे. पूर्वीसले बागलाणी म्हनजेच अहिरानी आशा तिना पुकारा व्हये. मात्र आज ‘बागलाणी’ हायी भाषा अहिरानीना येक भाग आशे आपू समजतंस. सध्या बागलाण, कळवण, मालेगाव, नांदगाव, चांदवड, दिंडोरी आनि सुरगाना या भागमा जी अहिरानी भाषा बोलतंस, तिले ‘बागलाणी’ भाषा म्हनतंस. तैन्हना बागलाण प्रांत भयान मोठा व्हता. त्यामा खान्देशबी समायेल व्हता. बागलाणमा बागूलस्ना आगोदर अभिरस्नी राजवट व्हती. हायी राजवट इ. स. २०३ ते ४१६ ना सुमारले व्हयी. अहिरानी भाषा इसवी सनना ३ रा – ४ था शतकमा सापडस. म्हनजेच अहिरानी हायी मराठी बोलीतीन जुनी ठरस. भरतना नाट्यशास्त्रमा तिना विभाषा म्हंजे बोलीभाषा आशा पुकारा येस. वररुचीना व्याकरणमा तिनी भाषा अपभ्रंश म्हनीसन दखल घियेल शे.
sudhir deore
डॉ. सुधीर देवरे
‘राधामाधवविलासचंपू’ या ग्रंथनी प्रस्तावनामा इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यास्नी म्हनेल शे, ‘‘हा अनेक भाषाज्ञातृत्वाचा धागा फार प्राचीन आहे. ज्ञानेश्वरांना संस्कृत, मराठी व बागलाणी भाषा येत असत… बागलाण हा त्याकाळी महत्त्वाच्या देशात मोडत असे व तेथे बहुतेक स्वतंत्र हिंदू राजे राज्य करीत असत.’’ (राधामाधवविलासचंपू, प्रस्तावना पृ. १४)
अकबर बादशहानी ‘ऐने अकबरी’ ग्रंथ लिह्या व्हता. त्यामा बागलाणना पुकारा येस. सुरत – नंदूरबार या दोन गावसमजारला भाग म्हंजे बागलाण. बागलाण हाऊ डोंगराऊ भाग शे, तठला लोक कनखर शेत, आशे अकबरनी ‘ऐने अकबरी’मा लिहेल शे. तधळ बागलाणमा १००० गावं व्हतात. बागलाणनी लांबी २०० मैल, रुंदी १६० मैल व्हती. ३० विभाग व्हतात. म्हंजे खान्देशतीन बागलाण मजारला परिसर मोठा व्हता. बागलाण प्रांतमा खान्देशनाबी सगळा भाग इये.
अभीर, अहीर, खान्देश, बागलाण या नावं कशा पडनात हायी जशे नक्की सांगता येत नही, तीच गत अहिरानी भाषानी उत्पत्तीनी शे. अहिरानीमा लिहेल साहित्य आगोदर मस नव्हतंच आशे नही. ते व्हयीच, तरीबी ते काळना पोटमा गुडूप व्हयी गयं व्हयी. अहिरानीमा लोकसाहित्य महामूर शे. अहिरानी बोलीभाषा म्हनीसन उरेल शे. ह्या भाषाना लिखित पहिला पुरावा इ. स. १२०६ ले मिळस.
चाळीसगावपशी दहा मैलवर पाटण गाव मजारला श्री भवानी मंदिरमा हाऊ शिलालेख शे. हाऊ लेख ज्ञानेश्वरीना आगोदर ८४ वर्ष म्हंजे शके ११२८ (सन १२०६) मजारला शे. लेखनी सुरवात संस्कृत भाषामा शे. अर्धा शिलालेखमा अहिरानीनामाळेक गंजनच शब्द दखातस.
चांदवड- दरेगाव (नांदुरी) सह्याद्रीन्या उपरांगा, अजिंठाना डोंगर, वाघुर नदी, सातपुडा परबत या चार सीमास्ना मजार आनि नर्मदा, तापी, पूरना, भोगावती, बारी, हत्ती, गिरना, पांझरा, मोसम, आरम, कान्हेरी, वाघूर, हडकी, गुळी, अनेर, वालेर, अरुनावती, गोमाई, वाकी, बुराई, अमरावती, सानपान, नेसू ह्या नद्यास्ना खोरामा अहिरानी भाषा बोलतस.
अहिरानीमा दोनेकशे शब्द बाकीन्या बोलीसतीन येगळा शेतस. आथरा – अंथरला, आढी – चारी, आवते – दोर, कुडचं – सदरा, शर्ट, उनात – आले, कोंडाळं – थालिपीठ, खंतड – रागीट, क्रोधी, खुरपी – उलथनी, चरवी – कळशी, चारीमिरे- सगळीकडे, चिंध्या – कापडाचे आडवे तिडवे तुकडे, चिडी – पाखरू, चिमणी, चिरा – दगडात कोरलेली पूर्वजांची मुर्ती, टिंगरी – सारंगी, डौर – चिरा, लोणचे, धुडके – फडके, कुरधाने – भाकर बांधायचे फडके, तईनपशी = तेव्हापासून, पानझोक – लोखंडी पत्र्यांचा गुच्छ, पुंजं – कचरा, बठा – बसला, मस – खूप, बार – लढाई, मन्हा – माझा, मामधरम – नामधारी, मोचडे – चप्पल, वहाना, बुट, मुडी – मोडली, वनी / वना – आली / आला, वाकल्या – तोंड वेंगाडणे, शिशि – बाटली, समार – मसाला, सानची – पकड, सुघरं भुगरं – मनोरा, सुईन – प्रसूती करणारी स्त्री, हयाती – आयुष्य, रावण्या- विनंत्या, आयकीसन – ऐकून, आंगडं – सदरा, बस / बैस – बसणे, घुगरी – उस्सळ, हेटे – पूर्व दिशा, वऱ्हा – पश्चिम, डोंगरखाल- दक्षिणोत्तर, सूर्याखाल- पूर्व पश्चिम, आण्हा – कुटे, बठ्ठा – सगळा.
अहिरानी बोली पट्टीमा लोकसकडथून ज्या उच्‍छाव साजरा व्हतस त्या अहिरानी लोकपरंपरा. या लोकपरंपरास्मा देव, दैवतं, इधी, पूजन, लोकश्रध्दा, लोकसमज, लोकभ्रम, उग्र उपासना पध्दती, अहिरानी भाग मजारलं आदिवासी लोकजीवन आनि लोकवाड्मय, बोलचालना शब्द, चालीरिती, रूढी, संकेत, गूढता आशा सगळा अंगस्ना इचार शे.
आखाजीना गाना, धोंडाना गाना, धोंड्याना गाना, सनस्ना गाना, खंडोबाना गाना, तळीभराना गाना, गवराईना गाना, गुलाबाईना गाना, कानबाईना गाना, मोटवरला गाना, भलरी गाना, काठीकवाडीना गाना, थाळीवरला गाना, डोंगऱ्या देवना गाना, टापऱ्या गव्हाराना गाना, आदिवासी गाना, भवाडाना गाना, खंजिरीवरला गाना, कापनीना गाना, वावरातला गाना, भिलाऊ गाना, देवस्ना गाना, देवीस्ना गाना, लगनना गाना, झोकावरला गाना, आडीजागरनना गाना, कोडा, आन्हा, उखाना, नाव घेनं, म्हनी, वाक्प्रचार, सुभाषितं, गप- गफाडा, लोककथा, लोकगीतं, नीतीकथा, वव्या, घरोटवरला गाना, बारातल्या गाळ्या, भारूड, आरत्या, लळित, गन, गौळन, लावनी, पवाडा, नाव घेनं, तमासा मझारली लावनी, यवहार मझारल्या गाळ्या… लोकगीतं आनि बरंच तोंडी धन अहिरानीमा दखास. यावाचू रोजना जगान्या पैरेल गोष्टी म्हंजे नावं ठेवानी रीत, अहिरानी मजारल्या जेवाखावान्या येगळ्या जिनसा, परिमान, यव्हहार, दैवतं, कानबाई, दागिना, झाडंस्ना येगळा नावं, मोठायीन रडानी रीत, दुख टाकाले आननं- जानं, दारवर जानं, लगनन्या रितीभाती, उलसा पोऱ्याले घुगरावनं, भवाडा, काठीकवाडी, कलापथक, वाजा, लोकरूढी, लोकपरंपरा, लोकसमज, रितीभाती आशा परकारना मसनस दालनं अहिरानी तोंडी लोकसाहित्यमा इखरेल दखातंस. आवढंच कसाले, मरेल मानोसकर्ता दुख दखाडाले अहिरानी बाया गानानागत हेल काढीसन रूढीखाल जे रडतंस, त्यास्नी सुदीक अहिरानी लोकसाहित्यमझार गनना करनी पडयी. यामा अहिरानी मजारला लोकसाहित्यनं भाषा भान कितलं खोल आनि कसबन शे हायी टहाळबन दखास.
ahirani bhasha
लिखित वाङ्मयमा सगळात आगोदर ‘लिळाचरित्रा’मा अहिरानी वाचाले मिळस. मराठी मजारला या पहिला पुस्तकमा बराच अहिरानी शब्द- वाक्य दखातस. चक्रधर स्वामी यास्नी लोकप्रबोधनकर्ता काही परमानमा अहिरानीना वापर करेल शे. लिळाचरित्रमा ‘ढासलं, रांधलं’, पुंजं आशा अहिरानी शब्द. म्हंजे १२ वा शतकमा अहिरानीले चांगला दिन व्हतात.
ज्ञानदेव ह्यासनी येक बागलाणी गवळण प्रसिद्ध शे. ‘‘मे दुरार्थि कर जोडू । ताऱ्हो सेवा न जागुं ।१। मन्हारे कान्हा मन्हारे कान्हा । देखी कां न गिणारे मन्हा कान्हारे ।।२।।
संत ज्ञानेश्वर यास्नाच बागलाण नवरीना रूपकात्मक अभंग प्रसिद्ध शेतस. ‘‘करीं वो अद्वैत माला केले इसन्यो सहिंवर सिद्ध पुरासि गयो । बोलु नहीं तया दादुला भवसागरीं न सरत कीयो ।।१।। मान्हा वऱ्हाडिणी नवजणी सांगातिणी सवें बारा सोळा । अनुहात तुरे वाजोनि गगनीं जगी जया सोहळा । मान्हा पतीपर्यंत त्याले देखि वो जग जाया आंधळा ।।२।।
ज्ञानेश्वरना अहिरानी पदंबी शेतंस. ‘‘यशोदेना बाय तान्हा मले म्हने हाइ लें वो, मी तं बाई साधी भोई गऊ त्याना जवई…
‘राधामाधवविलासचंपू’ ऊर्फ ‘शहाजी महाराज चरित्र’ हाऊ ग्रंथ जयराम पिंड्ये ह्या कवीना शे. हाऊ ग्रंथ शके १५७५ ते १५८० ना आसपासना व्हयी. त्यावात बागलाणी (अहिरानी) काव्यबी शे. ग्रंथमा बागलाणीना पुकारामा तैन्हन्या मुख्य भाषास्मा गनना करेल शे. शहाजी राजाना दरबारमा ज्या कवीनी बागलाणीनं कवतीक कयं, त्यानं नाव ‘मोरिर ना भाट’ शे. हाऊ ग्रंथ वि. का. राजवाडे यास्नी संपादित कया. त्यास्नी प्रस्तावनामा बागलाणीवर लिहेल शे. (पृ. १३, १४)
मोरीरना भाटना बागलाणी गितं शेतंस. सोरठा – विनती असे तुम पास मि मोरिरना भाट शौ । शाह झणी तुम हास, बागलाणन्हा बोल ले ।। शके १६४८ मा जैन कवी निंबा यानीबी येक पोथी लिहेल शे. या पोथीमा ‘अहिरानी’ नावनच भक्तीनं – उपदेशनं येक अहिरानीमा गानं शे. हायी अहिरानी गीत पाच कडवास्न शे. हाऊ जैन कवी विदर्भ मजारला राहिसनबी त्यानी अहिरानी शब्दस्ना वापर करेल शे. तठे, जीनपास, तान्हा, मन्हा, त्याले, मन्ह, मननी आशा शब्द शेतस… पन हायी काव्य आज सापडत नही. १६८० ते १७५० ह्या काळमा ‘कमलनयन’ नावना बागलाणी- अहिरानी कवी बागलाण तालुकामझारला अंतापूर या गावले व्हयी गया. ‘नयनमहाराज’ म्हनीसनबी त्या वळखायेत. त्यास्नी लिहेल काव्य आज नामशेष व्हयेल शे. पन त्यास्ना ‘अभंगावली’ नावना ग्रंथ आजबी मुल्हेरले पाव्हाले मिळस. अभंगावलीमा १५०० ओव्या शेतीस. त्यामा ५ ते ६ बागलाणी – अहिरानी भाषामा पदं शेतस. कवी कमलनयन यास्न येक अहिरानी काव्य : ‘‘मान्हा हरि मी सऊ हरिना पोसनावो, जन्मोजन्मीना दास श्रद्धवासनावो, काय गरज मुक्तनी, माले रतीसे भक्तीन्ही भावं भासनावो ।।धृ।।’’ (अभंगावली)
आशा काही रचना सोड्यात ते राजकीय आनि आध्यात्मिक ग्रंथस्मा अहिरानीना लिखित भक्कम पुरावा सापडत नही. याना आर्थ प्राचीन- अर्वाचीन काळमा अहिरानीमा लिखान व्हयेल नशे, आशे नही. अहिरानीना बाबत राहेल पाठकस्नी- पुराणिकस्नी आढी आनि आकसमुळे अहिरानी भाषा मजारलं बाकीनं लिखान मरी गयं व्हयी. थोडकामा, अहिरानी भाषाले कायमसरूपी मूळनी राजसत्ता आनि ग्रंथसत्ता मिळनी नही, म्हनीसन अहिरानी भाषानं भयान नुकसान व्हयेल दखास. याना दुसरा अर्थ आशाबी निंघस, बारावा शतकपशी आठरावा शतकपावत अहिरानीमा लिखान करनं हायी सहज सोपं आनि मानमरातब मिळानं लक्षन व्हयी. पन नंतर लिव्हाना यव्हहार मराठीमा व्हवाले लागा. अहिरानीले हलकामा घिदं. म्हनीसन आजबी अहिरानीना अस्सल गाभा पाव्हाकर्ता लोकसाहित्यकडे जानं पडंस.
अहिरानी आधुनिक साहित्यमा काही अपवाद सोडात ते हातले मस काही लागत नही. पन भविष्यकर्ता आशा कराले नक्कीच जागा शे.
आपू आठे भाषाना जागर करी ऱ्हायनूत. आपली जीभवरली भाषा जर बोलाले कोनी मनाई कयी ते आपली जीभ कापानंगत व्हयी. दोन जनस्ले येकमेकनं सांगेल कळनं त्ये जयी ती भाषा तयार. मंग तुमी तिले कोनतंबी नाव द्या. तिले नाव दिधं नही तरी कोनतीबी भाषानं काहीच आडत नही. मंग आशा भाषा त्या त्या लोकस्ना गटनं, जातपातनं नाव लायीसन लोकजीवनमा तग धरी ऱ्हातीस. अहिरानी भाषाबी खान्देशमा आशीच तयार व्हयनी. लोकजीवन म्हंजे लोकस्न रोजनं जगनं. हायी जगनं भाषामा वनं आनि अहिरानी भाषा तयार जयी.
संस्कृत मजारतीन मराठी आनि मराठी मजारतीन अहिरानी आशी जी आजपावत आपुले कोनी अहिरानी भाषानी उत्पत्ती सांगी व्हयी ती चूक शे. बोलीभाषास्पशी प्रमाणभाषा तयार व्हस. अहिरानी हाऊ आठला लोकस्ना सामाजिक अनुबंध शे. सामाजिक अनुबंध म्हंजे समाजसंगे नातं.
जशा मानसं, तशा देव. विधी, विधि- नाट्य आणि देव देवता यास्माबी त्या त्या भागनी- परिसरनी दाट सावली पडेल ऱ्हास. जशे मानसस्न रोजनं जगनं, राग-लोभ, काम, भ्याव, समजुती, भक्ती ह्या परंपराखाल त्या त्या भागमा तयार जयात तशा त्यावर तोडगा म्हनीसन या देवबी मानोसले आधार देवाकर्ता तयार व्हयनात. अहिरानी भाषा आठेच तयार जयी, आठेच रांगनी, आठेच तिन्हा बोबडा बोल फुटनात आनि आठेच ती चार जिल्हास्मा हात पाय पसरी तिन्हा जम बसाडा.
ahirani bhasha
अहिरानी लोकसंस्कृतीना येगयेगळा रूपडा : कोनतीबी येक संस्कृतीमा फगत येकच आशी लोकसंस्कृती ऱ्हात नही. लोकसंस्कृतीसले येगयेगळा रूपडा ऱ्हातंस आनि ह्या रूपडास्मातून सगळास्ले बसाडी घी आशी लोकसंस्कृती घडस.
* विधी : व्रत घेनं, चक्कर भरनं, तोंड पाव्हानी पध्दत, सुखगाडी (सुखदेवता), पोरापोरीसना नाव ठेवानी रीत, पानी पडत नही म्हनीसन देवपावाकरता धोंड्या काढानी पध्दत, तुळशीनं लगन लावनं, जावळं काढनं, घरभरनी करनं, आशे गंजनच.
* विधी- नाटक : भवाडा, खंडोबा आढीजागरन, अहिरानी लळित, भिल आनि कोकना यास्ना डोंगऱ्या देवना उच्छाव, कोकना आदिवासी भाऊस्नी कन्सरा माऊली, वैदनी बाहेरनं व्हयेल मानूसनी पटोळी पाहनं, लगनन्या येगयेगळ्या परंपरा, तंट्या भील, मंत्तर मारीसन पान उतारनं (साप चायेल उतारना), इच्चू उतारना, मंतर-तंतर, पटोळी पान्ह आशे गंजनच.
* देव देवता : कानबाई– रानबाई बसाडनी, गौराई बसाडनी, काठीकवाडी काढनं, खांबदेव पुजनं (नागदेव, वाघदेव), म्हसोबा, आया, डोंगरदेव, मुंजोबा, कन्सरा माऊली, आशे गंजनच.
* खेळ : आखाजीना बार, झोका, गोफन, गलोल, आशे गंजनच.
* लोकसाहित्य : बारमजारल्या गाळ्या, झोकावरला गाना, घरमा कोनी मयत जयी ते बायास्न दुखमजारलं पन गानानंगत म्हनी म्हनी रडनं, लोकगीतसमजारला तीनशे साठ- नऊ लाख आशा परिमानं- शब्द, उखाना, आन्हा, लोकगीतं आशा गंजनच.
* रूढी- रिती : अहिरानी खावान्या वस्तू- भाज्या- शाक- पालं, जिनसा, दुख टाकाले आननं, दारवर जानं आशे गंजनच.
* वाजा : खंजिरी, डफ, तुनतुनं, ढोल, ढोलकी, टिंगरी, पवा, पावरी, घांगळी आशा गंजनच. * नाच : फेरा नाच, दबक्या नाच, शिमगा नाच, भिलाऊ नाच, सांबळ नाच, ढोल नाच आशा गंजनच नाचान्या परंपरा. दरोजन्या गाळ्या : फिंद्री, रांडना, रांडनी, निपजेल, जातवान, आयमरी खायी जावो, हिना काकडा वल्हायी जावो, भोसडीना, सुक्काळीना, भोसडीनी, निसवायेल, नितातेल, वैचा जायेल, आत तुनी मायले, बऱ्हानी, बह्याळ, लग्गर आशा गाळ्या अहिरानी भागमा देतंस
नाशिक जिल्हामजारली अहिरानी पट्टामजारली लगननी पध्दत आनि जळगाव जिल्हामजारली अहिरानी पट्टामा लगननी पध्दत, विधी, लोकगीतं यामा बारीक फरक दखातीन.
कसमादे पट्टामजारल्या लगनन्या इधी परंपरा : पोर पाव्हाले जानं, पोरगाले आवतन देवाले जानं, सुपारी फोडनं, नारळ देनं, साखरपुडा, चिरामुंदी, बस्ता बांधनं, दिवट्या बुधल्या करनं, मुळ लावनं, पानसुपारी, बेल मांडव सांगनं, मांडव आननं, मांडव टाकनं, आरबोर बांधनं, मांडव बेळीस्न आवतन देनं, चुल्हाले आवतन देनं, भावबंदकी सांगनं, दिवटी पाजळनं, तळी भरनं, देव घेवाले जानं, तेलन पाडनं, सायखेडं आननं, फुलोरा टांगनं, देव घडवनं, देवस्न लगन लावनं, देव नाचवनं, हळद कांडनं, हळद लावनं, कुंवारपन फेडनं, शेवंती काढनं, रूखवत आननं, वरमाया काढनं, पाय धुनं, वान लावनं, वान जिकनं, ताट लोटी लावनं, साड्या नेसवनं, वट्या भरनं, टोप्या घालनं, उपरना देनं, नवरदेव ववाळनं, गळाभेट घेनं, मिरवनूक काढनं, फुलकं काढनं, कलवरी जानं, नवरा नवरी खांद्यावर घीसन नाचवनं, अंघोळ घालनं, काकन पोयतं बांधनं, काकन सोडनं, तोंड धुवाले जानं, परनं जानं, गुळन्या टाकनं, नाव घेनं, मांडवफळ बसनं, सत्यनारायन घालनं, शिदोरी आननं, शिदोरी पाव्हाले जानं, उलटापालट करनं, मांडोखाल घी जानं, मांडो टिपाले जाणं, चुल्हाले पाय लावाले जानं आशे गंजनच. ह्या इधी- रूढी धुळा, नंदुरबार, जळगाव आठल्या इधीससांगे ताडी पाह्यात ते बराच बारीक भेद दखातीन. काही कमी आनि काही भयान येगळं आशेबी दखाई पन ते साहजिक शे. तरीबी अहिरानी जीवन धागास्मा येक धागा कुठेबी ह्या लोकसंस्कृतीमा सारखाच शे.
अहिरानी भाषा जतन कराकर्ता, तिन्ही काळजी कराकर्ता अहिरानी बोलीक पट्टामा याळेयाळ नवनवा मंडळं उजेडमा येवा लाग्यात. हायी मायबोलीकर्ता भयान जथापत म्हंता यी. बहुत्येक संघटनास्मजारला कार्यकर्तास्ले आतापावतना अहिरानी लेखकस्ना नुस्ता आयकीसनच नावं ठाऊक ऱ्हातंस. बठ्ठा पुस्तकं वाचानं त्ये दूरच पन त्या लेखकस्नी नक्की कसावर आनि काय ल्ही ठियेल शे? काय संशोधन करेल शे? त्यास्ना पुस्तकंस्ना नावं काय शेतस? हायीसुध्दा अजिबात ठाऊक ऱ्हात नही. अहिरानीनी परत्येक संघटनानी आतेपावतना सरवा लेखकस्ना पुस्तकं (पाच- दहा प्रती) इकत घीसन संघटनाना हापीसमा ठेवाले पायजेत, सभासदनी त्या वाचालेसुदीक पायजेत.
अहिरानी मजारला काही शब्दस्ना आठे जागर करना शे. आज शहर आनि खेडं यामा मस फरक नही. शेतकरीबी आज आधुनिक अवजारं वापरी ऱ्हायना. बैलगाडीनं जागे ट्रॅक्टर वनं, मोटनं जागे इजनी मोटर वनी, नागरान्या, वखरान्या, पैरान्या, धान्य काढान्या सगळ्याच पध्दती बदलन्यात. (म्हनीसन पाथ, मुचकं, मोगरी, कांडनं, नाडा, सावळा, जुवाडं, साटली, धाव बसाडनं, तुंबडं, खळं, भुई घेनं, खळं लावनं, हाळ, गव्हान, खुट, सारंग आशा गंजनच शब्द भाषामातीन याळेयाळ गुपीत व्हयी चालनात.)
आपला ल्हानपने गावमा सगळाच शेतकरीसजोडे बैलगाड्या व्हत्यात. म्हनीसन बैलगाडीना सगळा अवयवस्ना- भागस्ना नावं आपली जिभवर राहेत. पन आज चाळीस वरीसनंतर, बैलगाडी चालाडाले बठतंस त्या फळीले काय म्हंतंस आपुले याद येत नही. त्या फळीले ‘पाटली’ म्हंतंस हायी कधळशे याद येस. दूर कथं जानं जयं त्ये पानीकर्ता पानी भरी बैलगाडाले टांगी चामडानी येक पिसोडी घी जायेत. तिले काय म्हनतंस? बैलगाडीमा भरेल माटी, दगडं, खारी माटी रिकामी कराकर्ता गाडी मांगला भागले भुईवर टेकाडतंस, तधळ बैलगाडी ‘उल्हाळ’ व्हस त्ये मोरला भाग ‘धुराळ’ व्हस.
महाराष्ट्रमा मराठीन्या पासष्ट बोलीभाषा दखातीस. त्या सर्वास्मा अहिरानी भाषाना पट्टा आडवा उभा बराच मोठा त्ये शेच, पन ह्या पट्टामजारला आथा तथा कामसकरता जायेल लोक महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रना बाहेरबी आपली भाषा इमाने इतबारे बोली ऱ्हायनात. अहिरानी भाषा दुसरीकडेबी रूळी ऱ्हायनी. कामले, मजुरीले, नौकरीले जायेल मानससन्या, पहिलापशी काही ठिकाने वस्त्या व्हयी गयात. तठेबी आज अहिरानी भाषा जित्ती दखाई ऱ्हायनी. जशे, नाशिक सिडको, नाशिक बळीराम मंदिर भाग, नाशिक पेठ रोड, नाशिक जत्रा हाटेलना भाग, पुणाना काही भाग, पिंपरी, चिंचवड, संभाजी नगरना काही भाग, सुरत, बडोदा. आशा काही भागस्मा अहिरानी जीव धरेल शे. (बडोदाना राजा- सयाजीराव गायकवाड सोता अहिरानी भाषिक व्हतात.)
फगत अहिरानीमाच सापडतीन आशा काही शब्द : झोऱ्या, मोचडं, मेचडं, डांजनं, खरंदगड, पांचफळक, दारुदरफडा, झुलई, दडस, वरमाड, फुरका, वडगन, पोतारा, गागा, डाभुर्ल, सरमट, मट्यारं, बंग्या, साबडं, डिर, गेदू, कुटाना, गटाना, मोगरी, पिटनी, आबगा, येकलपाई, गवांदखाल, कचकाई, फिस्क, बुचकं, फिंद्रा – फिंद्री, फुई, फुवा, जीजी, मुऱ्हाळी, हू, बुचका, सुम, फसकारा, तोहमत, किलवाना, बावच्या, बऱ्हानी, बह्याळ, पट्यारा, लग्गर, हेंगाडं, खंतड, सुकाळीना, उकतं, ताम्हा, च्याहूर, वडांग, बंगळी, किलचन, आडेकडे, कवाड, बागेबागे, आग्या, कुश्टाळं, शे, सावटा, बठ्ठा, फोत्र, सोला, साक्रू, कोंडाळं, पाटोड्या, डुबुक वडा, टहाळबन, डोंगरखाल, हेटे, वऱ्हा, रावन्या, गंगूती, आवळ्या, कोली, सोळी, सांजोरी, किलचन, सानं, सरी, आवते, नाडा, पुल्हाळ, चावळनं, ढेंगडं, ढुब्ब, आंगडं, कुरधानं, मांजन्या, तमान, साबडं, भनका, चोधडी, वैरन आशा गंजनच शब्द सांगता इतीन. शब्दस्नागतच वाक्‍प्रचारसुदीक अहिरानीमा भयानच येगळा दखातंस : टुमनं लावनं, ल्हाव करनं, रव करनं, ल्हनं नसनं, खिजी पडनं, हाय उफस करनं, आग पाखडनं, उजारी देनं, दनकारी देनं, डाच्च करनं, दडी मारनं, पोटमा बळी येनं, खिजी पडनं, उखाळ्या पाखाळ्या काढनं, उन्हात पाडनं, रुशी बसनं, बुरची घेनं, सरमाई जानं, हात वढाखाल ऱ्हानं, पान लागनं, चिपडं पडनं, काकडा वल्हावनं, हालकी वडांग ऱ्हानं, दिवाबत्तीनी येळ, लावदुऱ्या लावणं, उफडाई उठनं आशा गंजनच.
आशा सरवा शब्द, वाक्प्रचार, म्हनी, उखाना, आन्हा, लोकनाच, अहिरानी कीर्तन, गोंधळ, वही या बठ्ठा येची येची जतन करना पडतीन. मोऱ्हे आजून कोनता काळ कशा ई कोनले सांगता ई? हाई भाषानं धन येकदाव बुडी गयं ना, आखो जशेनतशे भायेर जित्त काढता येनार नही. चाळीस- पन्नासवरीस पयले ज्या शब्द सहज तोंडमा इयेत, त्या आज सहजासहजी येतं नहीत, त्ये हजार- पंधराशे साल आगोदरना शब्दस्न काय जयं व्हई? आपली भाषामातला आशा गंजनच शब्द दवडी जायेल व्हतीन. पन आज जे हयात शे त्ये यानं मोऱ्हे जीत्त ठेवनं व्हयी त्ये हाई आजनं सगळं आपुलेच आवरी (डाक्युमेंटेशन) ठेवनं पडई. तधळ आपली हाई भाषा अहिरानी मोर्‍हली पिढीले जित्ती दखाई.
भाषाना डाक्युमेंटेशनकर्ता आपुले आठला लोकजीवनन्या, हयातीन्या, भूगोलन्या येगयेगळ्या इभागन्या करन्या पडतीन. त्या त्या इभाग मजारला बठ्ठा शब्द गोळा करना पडतीन. त्या इभागं कोनता त्ये बी सांगस : नातागोतास्ना नावं- म्हंजे आपू अमूक नाताले काय नावखाल बोलतंस ते, अहिरानीमातला रंगस्ना नावं, येळ, काळ, ठिकानं, मापं, परिमानं, वार, याळना येगयेगळा भागस्ले आपू काय म्हंतंस, दिशा, अहिरानीमा अंक, आपला आंगना अवयव, दागीना, खानं, पिनं, सयपाक, वावर यामा आपू कोनकोनत्या जिनसा करतंस- त्यास्ले काय काय म्हंतंस, खेतीबाडी- वावरशिवरना येगयेगळा शब्द, झाडं, झुडपं, समाजना यव्हहारमा आपू दरोज काय काय शब्द वापरतंस, गुनदोश, इशेशनं लावानी आपली रीत- नाव देवानी रीत, जितराबं, किरकोडा मकोडा, कपडालत्ता, पोशाख, म्हनी, लोकदेवस्ना नावं त्यास्न्या इधी, चिरा कशा बसाडतंस, लोकसमज, बाजारहाट, लोकवस्तु, अवजारं, रूतू, महिना, दिशा, अंतरं, माप, आशा सगळास्ना निरनिराळा कप्पा करीसन शब्द जमाडाना. या सरवा इभागसमझारला शब्द झामली झुमली जमाडात आनि त्यास्ना वापर आपली रोजनी भाषामा करा लागूत ना, त्ये आपली भाषा- अहिरानी कैन्हच मरनार नही भाऊस्व, हाई नक्की. म्हनीसन अहिरानीनी शिरींमतींनं जतन कराकर्ता आपुले आता कंबर कशीसन काम करनं पडई.
bolibhasha
कोनतीबी बोली हायी तठला भूगोलमा राहनारा लोकस्ना रोजना यवहारमातीन- संवादमातीन तयार व्हस. म्हनीसन अहिरानी हायी अमूक येक भाषानी फाटी नही आनि अमूक येक भाषा हायी तिनी माय नही. अहिरानी भाषा ह्या पट्टामा तिनतीनी तयार व्हयेल शे. अहिरानी भाषानी उत्पत्ती आनि इतिहासना मराठी भाषाना उत्पत्ती आनि इतिहाससांगे ताळमेळ दखास. अहिरानी हायी मराठीइतलीच जुनी ते शेच पन बोली ऱ्हावामुळे ती मराठीनं आगोदरपशी आठला लोक बोलतं व्हतीन. भाषाशास्त्रना नियमखाल प्रमाणभाषातीन बोलीभाषा कायम जुन्या ऱ्हातीस आनि बोलीभाषाच प्रमाणभाषाले जनम देतीस. अहिरानी हायी प्राचीन- आदिम भाषा व्हयी.
भरतना नाट्यशास्त्रमा अहिरानीना विभाषा म्हंजे बोलीभाषा म्हनीसन पुकारा व्हस, तशेच वररुचीना व्याकरणमा अहिरानीना अपभ्रंश म्हनीसन व्हयेल पुकारा अशा आधारसवरतीन अहिरानी भाषा इसवीसनना तिसरा- चौथ्या शतकइतली जुनी शे, हायीबी ध्यानात येस.
अहिरानी भाषा सावठा परिसरमा बोलतस. आडवा- उभा कोसो दूर प्रदेशमा पसरेल येकच भाषाना काही काळमा निरनिराळ्या भागस्मा निरनिराळा रूपं व्हयी ऱ्हातस. येखांदी भाषा तिना भागमा येगयेगळा ‍इभागमा बोलतस तधळ तिना त्या त्या इभागमा येगळा रूपं तयार व्हतस.
याना आर्थ येगळा रूपं म्हंजे येगळी भाशा आशे नही. म्हनीसन अहिरानी आठूनतठून येकच भाषा शे.
अहिरानीमजारला गंजनच शब्दस्नी उत्पत्ती लावता येत नही. त्या शब्दस्ना काही रूपंबी मराठीमा, गुजरातमा, हिदींमा नहीथे संस्कृतमा दखातं नहीत. काही शब्दस्ना धातूबी यकदम निराळा शेतस. जशे, कुदी, चेंद, आंखोर, अमाप, जित्राब, इबाक, वश, तिबाक, कुठलोंग, तठे, बोंगान, खेचर, धंडले, जोयजे, टहाळबन, फुई, झोऱ्या, सानं, साक्रु, कावड, आघे, सोद, बागेबागे, आंदन, साटा, फोत्र, वडांग, हाड्या… आशा शब्दसनागतच येगळा रूपं, मसनच उच्चार आनि अहिरानीनं व्याकरणबी येगळं शे. यानामुळे अहिरानीना येगळापनवर उजेड पडस. रूपं, उच्चार, व्याकरण आनि शब्दसंग्रह या चारबी भाषिक गोष्टीसबाबत अहिरानी प्रमाणभाषा मराठीतीन भयानच येगळी शे.
अहिरानी हायी बारावा शतकना आगोदरच लिखानमा लिपिबद्ध व्हयीसन रुळनी व्हती. मात्र त्या काळना अभिजन वर्गनी आकस बुद्धीमुळे अहिरानी लिखाननं जतन जयं नशे आशे वाटस. संत ज्ञानेश्वर यास्नी मराठीमा काव्यरचना करनं ज्या कर्मठस्ले रुचनं नही आशा लोकस्ले अहिरानीमा करेल काव्यरचना कशी सहन व्हई? त्यास्नी आशा काव्यना पाठभेद, उतारा करीसन जतन करापेशा ती कशी मरयी, आशेच पाह्य व्हयी. म्हनीसन अहिरानी भाषाबाबत पाठकस्नी- पुरानिकस्नी आकस बुद्धीच अहिरानी भाषा मजारलं लिखान नष्ट व्हवाले कारन शे. या आकस बुद्धीमुळेच अहिरानी भाषाले काव्यसत्ता, पुराणसत्ता, पोथीसत्ता आनि म्हनीसन राजसत्ताबी मिळनी नही.
सिंधी, हिन्दी, गुजराती, मराठी ह्या भाषा मांगे कैन्हतरी येकदाव बोलीभाषाच व्हत्यात. पन त्या आज दिमाखमा प्रमाणभाषा व्हयेल शेतीस. कोकनी – मालवणी भाषा बोलणारा लोक अहिरानीतीन संख्यामा कमी राहीसनबी आनि त्यास्ना परिसर अहिरानीतीन उलसा राहिसनबी आज त्या प्रमाणभाषा व्हयी गयात. यानं कारन त्या भाषास्मा यवहार, साहित्य आनि ग्यान देवानं काम व्हयेल शे आनि त्या सगळा लोक येकमेकस्ले धरीसन चालनात. त्यास्नी भाशान्या येगयेगळ्या चुली मांड्या नहीत. अहिरानी लोकस्नी आशी येकी नही. याले अहिरानी मानससन्या येगयेगळ्या चुली नडन्यात.
अहिरानी मानूस जवपावत आठूनतठून येक व्हत नही, तवपावत आशेच चालू राही. अहिरानी भाषा हायी यवहार भाषा म्हनीसन फगत उलसा खेडापाडास्वर उरेल शे. जसजशे खेडास्न शहरीकरन व्हयी ऱ्हायनं, तसतशी अहिरानी गुडूप व्हयी ऱ्हायनी. अहिरानीले शहरस्मा जागाच उरनी नही. अहिरानीमा कसबन साहित्य जास्त नही. म्हनीसन अहिरानी हायी वाङ्मयभाषाबी नही.
आपू अहिरानीमा लिह्य ते आपलं लिखान वाचयी कोन? सगळा महाराष्ट्र मजारला वाचकस्ले अहिरानीमा लिव्हनारा लेखक म्हनीसन माहीत ऱ्हानार नही. मराठी वाचकपावत आपू पोचनार नही, हायी भ्याव व्हयी. अहिरानी भाषाना गंडमुळे अहिरानी मानूस हाऊ खोटा मराठी मानूस व्हवाले पहास. ह्या सगळा कारनंस्मुळे अहिरानीले याळेयाळ वांगला याळ यी ऱ्हायनात.
भाषाबाबतना शुध्द अशुध्दना दावा भाषाशास्त्रमा नही. भाषा हायी फगत संवाद साधाकर्ता येक सोय शे. म्हनीसन येखांदी भाषा बोलानी लाज वाटनं हाऊच येडापना शे. आज मराठी मजारबी अहिरानी मजारला निवडक येगळा शब्द हाटकून वापराले पायजेत. बोली जित्त्या राहिन्यात ते प्रमाणभाषा जित्त्या राहतीन. त्यानामुळे मराठी आखो कसदार शिरीमंत व्हयी.
आता मोठा आवाकाना अहिरानी साहित्य संमेलनं व्हवाले लागात हायी चांगली गोट शे. पन संमेलनं म्हंजे जत्रा व्हऊ नही. भाषा जगाडाकर्ता यामातून चांगलं भक्कम काम करनं पडयी. अहिरानीकर्ता तळमळ पायजे. या संमेलनमुळे आता अहिरानी भाषाना जागरूक लोकस्नी येक भक्कम फळी उभी व्हयी ऱ्हायनी, हायी भयान आनंदनी गोट शे.
अहिरानी परिसर मजारला विद्यापीठस्नी म्हनजे जळगावना बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठनी अहिरानीना अभ्यासले आधार दियेल शे हायी नक्की. पन हायी कोशीश आजून जोरबन, कसबन आनि भरीव व्हवाले पायजे.
थोडकामा, अहिरानी हायी येक प्राचीन आनि आदिम भाषा शे. हायी भाषा अंदाजे तिसरा- चौथा शतकना आगोदरपशी आठे बोलाई ऱ्हायनी. पन टहाळबन लिहेल पुरावा मिळतं नहीत म्हनीसन ती आगोदर जशी बोलचालपुरती आठे व्हती तशी आजूनबी बोलीनागतच परंपराखाल मांगे उरेल शे. मधला संतसाहित्यना काळमा तिन्हा जरासा आवाज आयकू येस, पन मोऱ्हे ज्यास्ना हातमा लेखनी व्हती त्यास्नी अहिरानीले जगाडानं सोडी मारानी कोशीश करेल शे. म्हनीसनच मोऱ्हे साहित्यमा तिनी भरभराट दखात नही. आजना अहिरानी मानूस पोट-भाग भेदमाबी (आमनीच अहिरानी भाषा खरी यामा) आडकेल शे, हायीबी येक मोठं कारन अहिरानीना अपेशमा दपेल दखास.
अहिरानी संस्कृतना आगोदरनी भाषा शे. म्हनीसन संस्कृत, अहिरानीनी माय नही.
अहिरानी लोकभाषा बोलाले- आयकाले भयान गोड शे. पन आजून हायी बोलीनी बाहेर कोनी पारख कयी नही. म्हनीसन ‍अहिरानी बाया ववी मजारतीन आजूनबी खत करतीस : बोली मन्ही अहिराणी, जशी दहिमान लोणी, सगळा पारखी ताकना, इले पारखं नही कोणी.
bahinabai choudhari

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!