विजय दिवसाची विजय गाथा – २
– संभाजीराव मोहिते
कर्नल संभाजी पाटील यांच्या संकल्पनेतून विजय दिवस समारोहाचा प्रारंभ झाला. बघता बघता शालेय विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा विषय झाला सुरुवातीला काही संचलने , आदींनी काही प्रात्यक्षिके होणारा विजय दिवस पाच सात वर्षात बाळसे धरू लागला.
कर्नल संभाजी पाटील यांचे निवृत्तीनंतर सैन्यदलाशी असणारे नाते सैन्य दलावरचा विश्वास,निस्पृह वृत्ती या जोरावर विजय दिवसाचा समारोह कराडची सांस्कृतिक ओळखच नव्हे तर मानबिंदू होऊन गेला. सुरुवातीच्या वर्षामध्ये सैन्य दलाची येणारी पथके यांच्या निवास व्यवस्थेची मोठी जबाबदारी संयोजकांवर असे. कराड सातारा परिसरात सैन्य दलाची छावणी नसल्याने सारी व्यवस्था करताना सुरुवातीला दमछाक होई.
मात्र देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे जवान होणाऱ्या अल्पसोई आणि बऱ्याचशा गैरसोयी गोड मानून घेत. संयोजकांची तारांबळा त्यांच्या ध्यानी येईल. मोठ्या संख्येने येणाऱ्या जवानांची पथके त्यांच्यासाठी निवासस्थाने,स्नानगृहे, भोजनालय ,शौचकुपे उभारणे आदी कामे नगरपालिकेचे कर्मचारी अगदी आनंदाने देश कार्य म्हणूनच आज अखेर करत आली आहेत. त्यामुळे स्नेहबंध हा जवान आणि नागरिक यांचे दरम्यान होऊन गेला आहे. जवानांचे साठी सूर्योदयापूर्वी ताजा भाजीपाला दूध आदी बाबी पुरवणे या सारख्या जबाबदाऱ्या स्वतःकडे घेण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू झाली. पंढरीच्या वारीचे गाव पंढरीच्या वेशीवर स्वागत व्हावे तसे स्वागत जवानांच्या पथकांचे होऊ लागले. हार तुरे घालून कराड नगरी स्नेहाच्या पायघड्या घालू लागले.
कर्नल संभाजी पाटलांच्या प्रयत्नाने रणगाडे, तोफा, रडार यंत्रणा ,रायफल्स दारुगोळा एक ना अनेक प्रकारचे युद्ध साहित्य जनसामान्यांसाठी हाताळण्यास खुले झाले. एखाद्या गावामध्ये सर्कस यावी आणि वन्य श्रापदांना पाहण्यासाठी अबाल वृद्धांची पिंजऱ्या भोवती गर्दी व्हावी जवानांच्या आगमना बरोबर अबाल वृद्धांची पाऊले वळू लागली जवानांसोबत सुसंवाद वाढीस लागला. साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा असा वाक्प्रचार मराठी साहित्यात जरूर आहे त्याचाच आदर करून कराड आणि परिसराने विजय दिवस अन जवान येथे नगरा
तोची दिवाळी दसरा
अशी आणखी आणखी उदात्त भर मराठी साहित्यात टाकली आज ती केवळ जतन नव्हे तर वृद्धिंगत होते आहे. आणि यातच दिवसाचे यश आणि उद्देश आहे.यावर्षी नवीन काय पाहायला मिळणार याच विचारात सारे असतात आणि ती सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी विजय दिवस कटिबद्ध असतो हेच खरे.
जय भारत!!!
(क्रमशः)