
– राजेश बाणावलीकर
खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रँडेड औषधांच्या किमतींपेक्षा जनऔषधी औषधांच्या किमती ५०%-८०% कमी असल्याचे सांगण्यात येते. ही औषधे उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी केवळ जागतिक आरोग्य संघटना – गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, प्रमाणित उत्पादकांकडून खरेदी केली जातात,असे सांगण्यात येते.
जनऔषधी मेडिकल स्टोअरचा हेतू सर्वांसाठी, विशेषत: गरीब आणि वंचितांसाठी, “जन औषधी मेडिकल स्टोअर” या विशेष केंद्रांच्या माध्यमातून परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार औषधे उपलब्ध करून देणे हा आहे, जेणेकरून आरोग्य सेवेतील खिशातून होणारा खर्च कमी करता येईल. बोधवाक्य उत्कृष्ट आणि सर्वात स्वागतार्ह आहे! पण दुकाने कुठे आहेत? बहुतेक लोकांनी त्या मेडिकल स्टोअर्सबद्दल ऐकलही नाही.
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे ही योजना सुरू करण्यात आली होती . या योजनेअंतर्गत, प्रधान मंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे म्हणूनओळखली जाऊ लागली आणि सर्जिकल ड्रग्सचे वितरण करण्यासाठी सुरुवात करण्यात आली. परंतु ही दुकाने दुर्गम ठिकाणी आहेत.शोधायची कुठे? पणजीला एक आहे.
जन औषधी केंद्रांचा लाभ जनतेला मिळावा यासाठी शासनाने प्रत्येक गावात जनऔषधी स्टोअर्स सुरू करायला हवेत. या योजनेंतर्गत प्रत्येक गावातील उपआरोग्य केंद्रांमध्ये स्टोअर सुरू करायला हवे होते. सरकारने धोरणाप्रमाणे कमी दराची औषधे देण्याचे नियोजन करून रोजगार निर्मिती करावी ,योजना म्हणून नव्हे.