‘विद्यार्थ्यांनी व्यावसायिक होण्यासाठी प्रयत्नशील रहावे’
फोंडा :
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सामान्य ज्ञान खूप मोठ्या प्रमाणात असले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतात त्यांनी त्या चांगल्या प्रकारे जोपासून ज्ञानात भर घालावी. विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता आपण स्वत: व्यवसाय सुरू करून यश संपादन करावे. असे विचार जल संसाधन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर हे प्रमुख पाहुणे या नात्याने कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्नेह संमेलनाला बोलत होते.
साजरेकुर्टी येथील कामाक्षी उच्च माध्यमीक विद्यालयाचे स्नेह संमेलन सहकार भवन येथे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंसाधन खात्याचे मंत्री, कॉपरेशन व प्रोवोदेरिआ, तसेच शिवग्राम शैक्षणीक संस्थेचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर, खास आमंत्रीत माजी प्राचार्य फ्रान्सीस फर्नाडीस, कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष विनायक सदा नाईक, उपाध्याक्ष उल्हास गाड केरकर, सदस्य श्रध्दा विनायक नाईक, प्राचार्य परमेश्वर भट, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी अजय सावंत, विद्यार्थी प्रमुख कुमारी अदिती बागायतदार उपस्थित होत्या.
ग्रामीण भागातील मुलांमध्ये विविध प्रकारचे कलागुण दडलेले आसतात हे कामाक्षी उच्च माध्यमिकच्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी खेळ व इतर गोष्टीचा आस्वाद घेताना वाचनाला प्राधान्य द्यावे. मुलांनी सतत सकारात्मकता बाळगून परिश्रम घ्यावे. असे प्रतिपादन माजी प्राचार्य फ्रान्सीस फर्नाडीस यांनी केले.
यावेळी अकरावी इयतेत्त पहिला क्रमांक पटकावलेल्या विज्ञान शाखेतून हवेरी मेहराज निसर, वाणिज्य शाखेतून देसाई पृथ्वी जयसिंग आनी कला शाखेतून सानिका सुरेश गावडे यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच गोवा बोर्डाच्या परिक्षेत बारावी विज्ञान मधून पहिली आलेली कुमारी सुश्मिता दामू गावडे, वाणिज्य शाखेत कुमारी प्रज्ज्वल तारी व कला शाखेत कुमारी नेहा शर्मा यांना गौरविण्यात आले. मुलींमधून पहिली आलेल्या कुमारी प्रज्ज्वल तारी व मुलांमधून पहिला आलेला अवित दत्ता गावडे यांनी खास बक्षिस देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर विषयामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कुमारी शमिता अंकुश जल्मी, कुमारी समिक्षा नारायण गावडे, कुमार स्वप्नील चंद्रकांत नायक, कुमारी तीर्था प्रेमानंद नायक, कुमारी निमिशा यतीन नायक, कुमारी श्रृंगी तारी या विद्यार्थांना स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव केला.
तसेच खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून कुमारी प्रज्ज्वल तारी हिला सन्मानीत करण्यात आले. मुलींमध्ये उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून अर्था सावंत तर मुलांमध्ये उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून वृषभ गावडे यांना गौरविले. आनी प्राचार्य पुरस्कार सहाना बानु हिला प्रदान केला.
तसेच यावेळी सनत मेमोरिअल समुहगीत गायन स्पर्धेचे बक्षिसं विजेत्या विद्यालयांना प्रदान करण्यात आली. कामाक्षी उच्च माध्यमीक विद्यालयात कार्यक्रमाची निस्वार्थीपणे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्ल कामाक्षी उच्च माध्यमीक विद्यालयाची शिक्षिका निशा चेरियन यांना प्रमुख पाहुणे जलसंसाधन खात्याचे मंत्री सुभाष अंकूश शिरोडकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कामाक्षी शैक्षणीक संस्थेचे अध्यक्ष विनायक सदा नाईक यांनी प्रास्तावीक व पाहुण्यांचे स्वागत केले. कामाक्षी उच्च माध्यमीक विद्यालयाचे प्राचार्य परमेश्वर भट यांनी सर्वाची ओळख केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लुईज वाज, वरदा गाड केरकर, वनिता देसाय, अनिल राऊत, शैला पै, रंजना नाईक, नामदेव नाईक, माधवी नाईक, तसेच रामदास नाईक इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा हातभार लागला. पूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका निशा चेरियन व आभार प्रदर्शन शिक्षिका सुरेखा नाईक यांनी केले.