विजय दिनाची विजय गाथा -३
– संभाजी मोहिते
विजय दिवस समारोहाला लोकप्रियता लाभली होतीच. आता समाज मान्यता ही मिळू लागली. समारोहाचे दशकपूर्ती बरोबरच जबाबदार प्रतिनिधी संस्था उद्योजक विजय दिवस समारोहाकडून अपेक्षांबरोबरच सहभागाच्याही अपेक्षेने चौकशी करू लागले. वृत्तपत्रांनी अत्यंत मोलाची भूमिका सुरुवातीपासूनच बजावल्यामुळे प्रसिद्धीसाठी विजय दिवस समारोहस फारसे प्रयास करावे लागत नव्हते. सुरुवातीच्या काळात समारोहाला मान्यवरांच्या सहकार्याची गरज भासत होती.(तशीच आजही ती आवश्यकता आहेच आहे)मात्र त्याचबरोबर विजय दिवस समारोह मधील उपस्थिती आणि सहभाग आहे अभिमानाचा विषय होऊ लागला.
याच सुमारास संभाजी पाटील यांच्या संकल्पनेतून आकारास आलेला विचार म्हणजे आदर्श विद्यार्थी निवड. थोर शैक्षणिक परंपरा स्वातंत्र्याबरोबरच कराडमध्ये अनेक शैक्षणिक दालने नव्याने उपलब्ध झाल्याने कराड हे आकाराने लहान मात्र गुणवत्तेत खूप पुढे होते आजही शैक्षणिक गुणवत्तेत ते पुढेच आहे त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनी मधून त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना चालना देण्यासाठी व त्यांच्यातील गुणवत्ता आदर्श विद्यार्थी निवड हा एक या निमित्ताने सुरू झाला. त्याचबरोबर कराडच्या सार्वत्रिक उन्नतीसाठी सर्वार्थाने जबाबदार असणाऱ्या थोर सुपुत्र स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचे केवळ स्मरण करून भागणार नव्हते त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी कर्नल संभाजी पाटील आणि सहकाऱ्यांनी जीवन गौरव यशवंत पुरस्कार देण्याचा विचार पुढे आणला. जीवनगौरव यशवंत पुरस्कारासाठी विजय दिवस समारोहणे प्रथमपासूनच नामांकने न मागवण्याचे धोरण निश्चित केले. अत्यंत काटेकोरपणे त्याच व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करावे ज्यांचा जडणघडणीमध्ये परिसराच्या उन्नती मध्येव सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात विशेष योगदान असावे.
जीवनगौरव यशवंत पुरस्काराची सुरुवात तर झालीच त्याचबरोबर कराड नगर परिषदेच्या वतीने ही एक सेना अधिकारी प्रतिवर्षी सन्मानित व्हावा हाही विचार स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पुढे आला. नेहमीच सहकार्याचा पुरस्कार करणाऱ्या कराड नगर परिषदेने याही सूचनेचा उचित गौरव करून अनोखी प्रथा येथे सुरू झाली. एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सैन्य दलातील अधिकाऱ्यास सन्मानित हा विचारच मुळी रोमांचित करणारा आहे तो विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे मोठे काम कराड नगरपरिषद सुमारे दोन दशके अव्यह्तपणे करत आहे. हा उपक्रम राबवणारी कराड नगरपरिषद ही केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगतामधील एकमेव स्थानिक स्वराज्य संस्था असावी यात संदेह नाही.
जीवन गौरव यशवंत पुरस्कार हा पूर्णतः अराजकीय असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. त्याचबरोबर समरोहाचे वतीने आदर्श माता, वीर माता वीर पत्नी आदर्श विद्यार्थी यांनाही सन्मानित करण्याची प्रथा सुरू झाली.
जीवन गौरव यशवंत पुरस्कार प्राप्तींमध्ये स्वर्गीय पी डी पाटील साहेब स्वर्गीय संभाजी बाबा थोरात स्वर्गीय जयवंतराव भोसले माननीय शरद पवार माननीय जयसिंगराव पाटील बापू माननीय पद्मभूषण नागनाथ अण्णा नायकवडी आचार्य शांताराम गरुड उद्योगपती बाबा कल्याणी माननीय सुभाषराव जोशी आदींसह अनेक मान्यवरांचा समावेश आहे. ही परंपरा आजही कायम आहे.
(क्रमशः)