बँक ऑफ बडोदाच्या सणासुदीच्या कर्जदरांत सवलती
मुंबई : बँक ऑफ बडोदाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ‘bob Ke Sang Tyohaar Ki Umang – Shubh Bhi, Labh Bhi’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत गृहकर्ज ७.४० टक्के, तर कार कर्ज ७.८५ टक्के प्रारंभिक व्याजदराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गृहकर्जाच्या प्रक्रिया शुल्कातून पूर्ण सूट देण्यात येत असून, पात्र महिला ग्राहकांना अतिरिक्त व्याजदर सवलत मिळणार आहे.
‘bob Green Wheels’ इलेक्ट्रिक वाहन कर्ज योजनेत ०.१५ टक्के व्याजदर सवलतीची तरतूद आहे. डेबिट कार्डद्वारे खरेदीवरही सहभागी व्यापाऱ्यांकडे सवलती मिळतील. महिला ग्राहकांसाठी विशेष बचत खाती आणि दरमहा ५०० रुपयांपासून बचत करता येणारी ‘bob Flexi Systematic Deposit Plan’ योजना उपलब्ध आहे.
लघुउद्योजकांसाठी ‘bob Green Plug’ योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पायाभूत सुविधांसाठी पाच कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. महिला उद्योजकांसाठी ‘Baroda Mahila Swavalamban’ ही तारणमुक्त वित्तपुरवठा योजनाही उपलब्ध आहे. सर्व लाभ पात्रता आणि बँकेच्या अटी-शर्तींनुसार मिळतील.






