अर्थमत/ टेक्नॉलॉजी

एमएसएमईंसाठी ॲक्सिस बँकेची सुवर्ण कर्ज योजना

मुंबई : खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या ॲक्सिस बँकने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) नवीन सुवर्ण कर्ज योजना सुरू केली आहे. लहान व्यवसायांना जलद, लवचिक आणि किमान कागदपत्रांसह खेळते भांडवल उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. सुरक्षित ओव्हरड्राफ्ट स्वरूपातील ही सुविधा बँकेच्या ३,३००हून अधिक शाखांमध्ये उपलब्ध असून, विद्यमान तसेच नवीन ग्राहकांना ती घेता येणार आहे.



या योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांना त्याच दिवशी काउंटरवर (OTC) कर्जाची रक्कम मिळू शकते, जी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. अंतर्गत धोरणे व पात्रतेनुसार कर्जाची मर्यादा ५० हजार रुपयांपासून १ कोटी रुपयांपर्यंत आहे. केवळ केवायसी, उद्यम नोंदणी किंवा असिस्ट प्रमाणपत्र तसेच आयटीआर किंवा जीएसटी नोंदणी इतकीच कागदपत्रे आवश्यक आहेत. सोन्याच्या दागिन्यांवर आधारित ही ओव्हरड्राफ्ट सुविधा असून, कर्जदारांना दरमहा केवळ व्याज भरावे लागते.


या सुवर्ण कर्ज योजनेत ८२ टक्क्यांपर्यंत लोन-टू-व्हॅल्यू (LTV) देण्यात येत आहे, जे या क्षेत्रातील सरासरी ऑफरपेक्षा अधिक आहे. तरीही ही योजना नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्ण पालन करते. बँकेची मजबूत जोखीम व्यवस्थापन व्यवस्था, काटेकोर सुवर्ण मूल्यांकन आणि तारण देखरेख प्रक्रियांमुळे उच्च LTV शक्य झाल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.


योजनेंच्या लाँचप्रसंगी बोलताना ॲक्सिस बँकेचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह आणि भारत बँकिंगचे प्रमुख बिपिन सराफ म्हणाले, “लघु व्यवसाय हे भारताच्या आर्थिक गतीचे केंद्र आहेत. मात्र, वेळेवर खेळते भांडवल न मिळणे ही त्यांची कायमची अडचण आहे. एमएसएमईंसाठी वेगवान, सुरक्षित आणि सुलभ कर्ज सुविधा देण्यासाठी ही सुवर्ण कर्ज योजना तयार करण्यात आली आहे. शिस्तबद्ध अंडररायटिंग आणि मजबूत जोखीम व्यवस्थापनाच्या जोरावर आम्ही विवेकपूर्ण मर्यादेत अधिक कर्ज पात्रता देऊ शकत आहोत.”


सध्या देशातील पतपुरवठा क्षेत्रात सुरक्षित कर्ज आणि एमएसएमई वित्तपुरवठा हे महत्त्वाचे वाढीचे चालक ठरत आहेत. सोन्याच्या वाढत्या किमती, बँकांचा सुरक्षित कर्जांवर वाढता भर आणि उद्योगांना लागणारी अल्पकालीन तरलता या पार्श्वभूमीवर सोन्याच्या तारणावर आधारित कर्जांचे महत्त्व वाढले आहे. या नव्या उपक्रमातून एमएसएमईंसाठी दर्जेदार आणि सुरक्षित वित्तपुरवठा करण्याची आपली बांधिलकी ॲक्सिस बँकेने अधिक ठामपणे अधोरेखित केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!