देश/जग

Padma Award 2026: पद्म पुरस्कारांची घोषणा, देशातील 45 मान्यवरांचा सन्मान

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च पुरस्कार (Padma award) मानले जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील अनेकांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये, लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषि (Agriculture) क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षीचे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यांसह पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका आणि आर्मिंदा फर्नांडीस यांनाही पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने 45 मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली असून प्रजासत्ता दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व सन्मानितांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 4 भूमीपुत्रांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये, लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांचाही समावेश आहे. लोककला, लोकनाट्य जपण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान होत आहे. दरम्यान, सन 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला होता.

पद्म पुरस्काराने सन्मानित नावे

भगवंदास रायकर (मध्य प्रदेश)
ब्रिज लाल भट्ट (जम्मू-कश्मीर)
चरण हेम्ब्रम (ओडिशा)
चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)
डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू-कश्मीर)
कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी (केरल)
महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)
नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)
ओथूवर तिरुथानी (तमिलनाडु)
रघुपत सिंह (उत्तर प्रदेश)
राजस्तापति कालीअप्पा गौंडर (तमिलनाडु)
सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालैंड)
थिरुवरूर बख्तवसलम (तमिलनाडु)
अंके गौड़ा (कर्नाटक)
डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)
गफरुद्दीन मेवर्ती (राजस्थान)
खेम राज सुंद्रीयाल (हरियाणा)
मीर हाजीभाई कसामभाई (गुजरात)
मोहन नगर (मध्य प्रदेश)
नीलेश मंडलेवाला (गुजरात)
आर एंड एस गोडबोले (छत्तीसगढ़)
राम रेड्डी ममिडी (तेलंगाना)
सिमांचल पात्रो (ओडिशा)
सुरेश हनागवाड़ी (कर्नाटक)
तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश)
युनम जत्रा सिंह (मणिपुर)
बुधरी ताथी (छत्तीसगढ़)
डॉ. कुमारासामी थंगाराज (तेलंगाना)
डॉ. पुण्णियामूर्ति नटेासन (तमिलनाडु)
हैली वॉर (मेघालय)
इंदरजीत सिंह सिद्धू (चंडीगढ़)
के. पाजनिवेल (पुडुचेरी)
कैलाश चंद्र पंत (मध्य प्रदेश)
नुरुद्दीन अहमद (असम)
पोकीला लेकटेपी (असम)
आर. कृष्णन (तमिलनाडु)
एस. जी. सुशीलेम्मा (कर्नाटक)
टागा राम भील (राजस्थान)
विश्व बंधु (बिहार)
धर्मिकलाल चूनीलाल पांड्या (गुजरात)
शफी शौक़ (जम्मू-कश्मीर)

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!