‘मलाबार गोल्ड अँड डायमंड्स’चे गोव्यातील पहिले शोरूम सुरू
आघाडीच्या दागिन्यांच्या विक्रेत्यांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने पणजीतील मिरामार येथील दयानंद बांदोडकर मार्ग येथे आपली पहिली शोरूम सुरू केली आहे. या शोरूमचे उद्घाटन झाल्याची घोषणा कंपनीने केली. हे या राज्यातील आजपर्यंतचे सर्वात मोठे दागिन्यांचे शोरूम आहे. कौटुंबिक परंपरा, जीवनशैलीवर आधारित खरेदी आणि वर्षभर असलेली पर्यटकांची मागणी यांतून आकारलेल्या या बाजारात मलाबारची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.
या शोरूमचे उद्घाटन बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या हस्ते झाले. यावेळी मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे कर्नाटक प्रादेशिक प्रमुख फिल्सर बाबू, कंपनीच्या व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी, हितचिंतक आदी उपस्थित होते.
सुमारे ६,००० चौरस फूट क्षेत्रफळात, दोनमजली रचनेत उभारलेले पणजी येथील हे शोरूम मोठ्या स्वरूपाचे डेस्टिनेशन स्टोअर म्हणून डिझाइन करण्यात आले आहे. स्पष्टपणे विभागलेले दागिन्यांचे विभाग, आरामदायी पाहणीसाठी मोकळी जागा आणि सुव्यवस्थित सेवा व्यवस्था यांवर या शोरूमच्या मांडणीत भर देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना विविध दागिन्यांच्या श्रेणी आणि किंमतीचे स्तर सहजपणे, स्पष्टतेने पाहता व निवडता येतात.
गोवा हा दागिन्यांचा एक वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण बाजार आहे. दीर्घकाळापासूनची स्थानिक मागणी, बदलत्या जीवनशैलीतील आवडीनिवडी तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा सातत्यपूर्ण ओघ यांचा आधार या बाजारपेठेला आहे. ज्या बाजारात मोठी संधी आहे, तिथे मोठ्या आकाराची शोरूम उघडून भरपूर प्रकारचे दागिने एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्यायचे आणि ग्राहकांना वेगवेगळ्या प्रसंगांसाठी दागिने सहज पाहता, तुलना करता आणि निवडता यावेत, अशी व्यवस्था करायची या धोरणाने पणजीतील ही शोरूम उघडण्यात आली आहे.
या शोरूममध्ये मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे वधूवेषासाठीचे, सणासुदीचे तसेच दैनंदिन वापरातील दागिन्यांचे समृद्ध संग्रह एकत्र ठेवण्यात आले आहेत. यामध्ये पारंपरिक विवाहसंग्रह, वारसा-प्रेरित डिझाइन्स तसेच आधुनिक शैलीतील दागिने समाविष्ट असून, सोने, हिरे, प्लॅटिनम आणि मौल्यवान रत्नांतील दागिन्यांची विविध श्रेणी वेगवेगळ्या आवडीनिवडी आणि वापराच्या प्रसंगांना अनुरूप अशी काळजीपूर्वक साकारण्यात आली आहे.
वधूवेष आणि विविध प्रसंगांसाठीच्या दागिन्यांसोबतच ग्राहकांना दैनंदिन वापरासाठीची तसेच आधुनिक शैलीतील दागिन्यांचीही विस्तृत श्रेणी येथे पाहता येईल. यामध्ये डायमंड पेंडंट्स, साखळ्या, ब्रेसलेट्स, स्टड्स, कॉकटेल रिंग्स, प्लॅटिनमचे दागिने तसेच मौल्यवान रत्नांचे दागिने यांचा समावेश असून, सर्व वयोगटांतील आणि विविध जीवनशैलीतील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन हा संग्रह तयार करण्यात आला आहे.
उद्घाटनाबाबत माहिती देताना मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, “गोवा हा दागिन्यांशी सांस्कृतिकदृष्ट्या घट्ट नाते असलेला बाजार असून, येथे वैविध्य आणि गुणवत्तेला महत्त्व देणारा ग्राहकवर्ग आहे. या राज्यातील आमच्या या पहिल्या शोरूमद्वारे आम्ही वधूवेष, सणासुदीचे, दैनंदिन वापरातील तसेच आधुनिक आवडी-निवडी अशा आमच्या संपूर्ण दागिन्यांच्या संग्रहाला एका ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. मोठ्या स्वरूपाच्या या शोरूममध्ये ग्राहकांना निवांतपणे पाहणी व तुलना करण्याची संधी मिळेल. तसेच पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता यांवर मलाबारचा भर असतो, तोही कायम राहील.”
‘ब्राइड्स ऑफ इंडिया’ या आपल्या प्रमुख जाहिरात मोहिमेच्या १५व्या आवृत्तीचा एक भाग म्हणून मलाबार गोल्ड अँड डायमंड्स गोव्यातील नव्या शोरूममध्ये मर्यादित कालावधीसाठी ग्राहकांना विशेष लाभ देणार आहे. या अंतर्गत ग्राहकांना सोन्याच्या, अनकट (न घडवलेल्या) तसेच मौल्यवान रत्नांच्या दागिन्यांवरील मेकिंग चार्जेस जास्तीत जास्त ३० टक्के सवलत, तसेच हिर्यांच्या किमतीवर जास्तीत जास्त ३० टक्के सवलत मिळू शकते. ही ऑफर १८ जानेवारी २०२६ पर्यंत चालू असून, लग्नासाठी दागिन्यांची योजना आखणाऱ्या व अंतिम निवड करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक अतिरिक्त फायदा ठरणार आहे.
पणजी येथील शोरूममध्ये मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडील ग्राहकांसाठीच्या सर्व हमी सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये पारदर्शक दररचना, योग्य ती घडणावळ (मेकिंग चार्जेस), देखभालीची आयुष्यभर सेवा, उत्पादनांची सविस्तर माहिती तसेच बीआयएस-हॉलमार्क असलेले सोने आणि प्रमाणित हिरे यांचा समावेश आहे.


