google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

भारतीयांच्या अपूर्ण झोपेचे ‘हे’ आहे एक मुख्य कारण…

झोपेमधील अडथळे, विशेषतः मुलांना झोपेत येणारा व्यत्यय त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर थेट परिणाम करत आहे अशी पश्चिम भारतातील 87% लोकांची खात्री आहे. जागतिक मलेरिया दिनाच्या (25 एप्रिल) पार्श्वभूमीवर, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL)च्या गुडनाईट या भारतातील आघाडीच्या घरगुती कीटकनाशक ब्रँडने सादर केलेल्या सर्वेक्षण अहवालातून हा महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. गुडनाईटने ‘वन मॉसक्युटो, काऊंटलेस थ्रेट्स’ या नावाने सादर केलेले हे अखिल भारतीय सर्वेक्षण YouGov या मार्केट रिसर्च फर्मकडून राबविण्यात आले. यात जनतेची मतं आणि डासांमुळे होणाऱ्या रोगांचा धोका याचे मूल्यमापन केले गेले. सर्वच भागांमध्ये ही चिंता व्यक्त करण्यात आली. उत्तर, पूर्व भारतात 87% आणि दक्षिणेत 86% प्रतिसादकर्ते याच मताशी सहमत आहेत.


या अभ्यासानुसार, झोपेची कमतरता हा भारतीय घरांमध्ये चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. रोज रात्री प्रौढ लोक सुमारे 2 तास झोप गमावतात, तर मुलांची झोप त्यांना गरजेच्या असलेल्या वेळेपेक्षा जवळपास 4 तास कमी होते. ही सततची झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करते, तणावाची पातळी वाढवते आणि विशेषतः मलेरिया व डेंग्यूसारख्या डासांमुळे पसरणाऱ्या रोगांप्रती संवेदनशीलता वाढवते.


पश्चिम भारतातील प्रौढांमध्ये डास हे झोपेच्या व्यत्ययाचे एक प्रमुख कारण ठरले आहेत. विविध वयोगटांमध्ये सुमारे 61% लोकांनी डासांच्या प्रादुर्भावाला अस्वस्थ झोपेसाठी जबाबदार धरले आहे. मुलांमध्ये याचा परिणाम अधिक तीव्र असून, पालक सांगतात की डास चावणे व सतत त्यांची कानाशी होणारी भूणभूण हे झोपेमधील अडथळ्याचे प्रमुख कारण बनले आहे. हे आजार किंवा अभ्यासाच्या तणावापेक्षाही अधिक ठरते.


गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अश्विन मूर्ती म्हणाले, “गुडनाईटचा ‘वन मॉसक्युटो, काऊंटलेस थ्रेट्स’ हा एक राष्ट्रव्यापी सर्वेक्षण अहवाल असून तो जनतेच्या दृष्टिकोनाचा अभ्यास करतो आणि डासांमुळे पसरणाऱ्या रोगांच्या धोक्याचे मूल्यमापन करतो. अशा उपक्रमांद्वारे आमचे उद्दिष्ट म्हणजे भारतात डासांच्या समस्येबाबत जनजागृती वाढवणे, कुटुंबांना डासांचा अटकाव करण्यासाठी कृती करण्याकरता सक्षम बनवणे आणि देशासाठी परवडणाऱ्या पण नाविन्यपूर्ण उपाययोजना सादर करणे हे आहे. भारतात दरवर्षी 40 दशलक्षाहून अधिक नागरिक मलेरिया, डेंग्यूसारख्या डासांमुळे होणाऱ्या रोगांनी ग्रासतात. आजारामुळे काम, शाळा, सामाजिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांपासून लांब राहावे लागते, सक्तीची रजा घ्यावी लागते. आरोग्यसेवेसाठी खर्च करावा लागतो आणि उत्पादकतेत घट होते. हे सर्व आर्थिक नुकसानीचे कारण ठरतात. भारतीय अर्थव्यवस्थेची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आणि जीडीपी टिकवण्यासाठी एक सक्षम आणि निरोगी कामकाज करणारा वर्ग आवश्यक असतो. डासांमुळे पसरणाऱ्या रोगांच्या वाढत्या प्रमाणावर मात करण्याचा एक व्यावहारिक मार्ग म्हणजे हे प्रश्न वेळेवर सोडवणे.”


फक्त थकवा नाही, तर झोपेच्या अभावाचे परिणाम दूरगामी असतात. वैद्यकीय तज्ज्ञ चेतावणी देतात की झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करू शकते. त्यामुळे डासांमुळे होणाऱ्या आजारांसह अनेक संसर्गजन्य रोग होण्याचा धोका वाढतो. याचा भावनिक आरोग्यावरही परिणाम होतो. तणाव वाढतो, चिडचिड वाढते आणि दिवसभर एकाग्रता कमी होते.


गुडनाईटच्या अहवालावर भाष्य करताना मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. कीर्ती सबनीस म्हणाल्या, “एक डास देखील प्राणघातक रोग पसरवण्याची क्षमता ठेवतो हे समजणे अत्यावश्यक आहे. हे लहानसे कानाशी भूणभूण करणारे कीटक डेंग्यू, मलेरिया व इतर अनेक रोगांच्या फैलावामागचे धोकादायक कारण आहेत. ते रोगप्रतिकारक शक्ती दुर्बल करतात. त्यामुळे इतर रोग होण्याची शक्यता वाढते. ही सततची भीती आपल्या आरोग्याला धोका पोहोचवते आणि निरोगी व उत्पादक जीवन जगण्याची क्षमता बाधित करते. डासांमुळे होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करणे ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून, ती आपली आणि आपल्या समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!