‘ज्यांना दिले ते नाराज, ज्यांना काहिच दिले नाही ते सोबत…’
मुंबई :
शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदासह, आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मी पुन्हा येईल असे म्हटलो नव्हतो. पण आलो, त्यामुळे मी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे. यापुढे फक्त शिवसेनेचीच धुरा सांबाळणार, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेला ५६ वर्ष झाली. कोण रिक्षावाले, टपरीवाले, यांना नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री बाळासाहेबांनी केले. ज्यांनी आपल्याला मोठे केले. त्यांनाच विसरले. त्यांना जे काही देता येईल ते दिले. मागील सहा-सात दिवसापासून मातोश्रीच्या बाहेर साधी-साधी मानसे येत आहेत.
ज्यांना दिले ते नाराज आहेत. ज्यांना काहिच दिले नाही ते सोबत आहेत. शिवसेनेचे आणि शिवसैनिकांचे जे नाते आहे, त्याच जोरावर शिवसेना मजबूत उभी राहिली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. काल मी आवाहन केले होते. तुमची नाराजी नेमकी कोणारव आहे. नाराजी सुरतला आणि गुवाहटीला जाऊन सांगितली. तुमच्या मनात नाराजी होती तर ती मातोश्रीवर येवून सांगायला पाहिजे होते.
मुंबईमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल येत आहे. मला लाज वाटते, तुम्ही आमदार झाल्यानंतर ज्या शिवसैनिकांनी गुलाल उधळला. त्यांच्याच रक्त सांडणार आहात का, असा सवालही ठाकरे यांनी केला. उद्या लोकशाहीचा जन्म होणार आहे. तुमच्या मार्गामध्ये कोणिही येणार नाही. किती आमदार आहेत. डोकी फक्त मोजण्यासाठी वापरायचे का मला त्यामध्ये रस नाही, असे ठाकरे म्हणाले.