पणजी :
मिरामार येथे सोडून दिलेली ताल्हुली आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हरवलेली हार्ड-डिस्क रिकामी तिजोरी आणि पोकळ आश्वासने देणाऱ्या कामचलावू व सदोष भाजप सरकारचे थेट प्रतिबिंब आहे. संपूर्ण प्रशासन कल्पनाविलास आणि दिवास्वप्न पाहत कार्यरत आहे. तान्हुलीच्या आरोग्यासाठी माझी प्रार्थना आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
मिरामार येथे बेवारस अवस्थेत सापडलेली तान्हुली मुलगी आणि त्यानंतर तेथे बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे हार्ड-डिस्कशिवाय असल्याची उघड झालेली माहिती यावर प्रतिक्रीया देताना, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुलींना सुरक्षितता आणि सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरल्याबद्दल भाजप सरकारवर गंभीर टीका केली.
मिरामार येथे बेवारस अवस्थेत सापडलेली तान्हुली मुलगी आणि त्यानंतर तेथे बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे हार्ड-डिस्कशिवाय असल्याची उघड झालेली माहिती यावर प्रतिक्रीया देताना, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुलींना सुरक्षितता आणि सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरल्याबद्दल भाजप सरकारवर गंभीर टीका केली.
सुमारे 10 दिवसांच्या बालिकेला उघड्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना “बेटी बचाओ, बेटी पढाओ”चा नारा देणाऱ्या भाजप सरकारचे अपयश उघड करते. लोकांना अजूनही मुलगी ही कुटुंबावर ओझे वाटते. दुर्दैवाने, असंवेदनशील भाजप सरकारने मुलींना त्यांच्या शैक्षणिक करिअरसाठी किंवा व्यावसायिक गरजांसाठी “लाडली लक्ष्मी” योजनेचे पैसे वापरण्यास देण्यात आलेली मूभा बंद केली असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.
मिरामार किनाऱ्यावर महत्वाच्या ठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे हार्ड-डिस्कशिवाय आहेत हे घृणास्पद आहे. यावरून कायद्याची अंमलबजावणी करणार्या प्राधिकरणांचे पूर्ण अपयश आणि सरकारमधील भ्रष्टाचार उघड होतो. या घटनेमुळे गुन्हेगारांना कोणतीही भीती न बाळगता त्यांच्या कारवाया करण्यास प्रोत्साहन मिळेल, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.
मुलीला सोडून देणे ही एखादीच घटना मानणे चुकीचे ठरेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मुलींच्या संरक्षणासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि सर्व संबंधित अधिकारी आणि हितधारकांची तातडीने उच्चस्तरीय बैठक घेणे गरजेचे आहे अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदार असलेल्या सर्व संबंधित प्राधिकरणांचा सर्वंकष आढावा घ्यावा. हार्ड-डिस्कशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे कसे बसवले गेले याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचीही माझी मागणी आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.