सिनेनामा 

शाहरुखने जिंकला कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार

७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज ( १ ऑगस्ट ) दिल्ली येथे करण्यात आली आहे. कलाकार व तंत्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. भारतात १९५४ पासून राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाली होती.

७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून यंदा शाहरुख खानला तब्बल ३३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विक्रांत मॅसी आणि शाहरुख खान यांना विभागून देण्यात आला आहे. तर, राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे.

७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे…

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – केरला स्टोरी – सुदीप्तो सेन
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहरुख खान ( जवान ) आणि विक्रांत मॅसी ( 12th Fail )
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – राणी मुखर्जी ( मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे )
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजयराघवन ( पूक्कलम ) आणि मुथुपेटाई सोमू भास्कर ( पार्किंग )
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उर्वशी ( उल्लोझुक्कू ) आणि जानकी बोडीवाला ( वश )
  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार – सुक्रिती वेणी बंदरेड्डी, कबीर खंडाणे आणि त्रिशा ठोसर
  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – प्रशांतनु महापात्रा ( द केरला स्टोरी )
  • सर्वोत्कृष्ट पटकथा – साई राजेश नीलम ( बेबी ) आणि रामकुमार बालकृष्ण ( पार्किंग )
  • सर्वोत्कृष्ट संवाद लेखक – दीपक किंगराणी, सिर्फ एक बंदा काफी है
  • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – मोहनदास ( २०१८ )
  • सर्वोत्कृष्ट ॲक्शन कोरिओग्राफी – हनु-मॅन (तेलुगू)
  • सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट – श्रीकांत देसाई (सॅम बहादूर)
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सचिन लोवळेकर, दिव्या आणि निधी गंभीर ( सॅम बहादूर )
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – वाथी (तामिळ)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – Animal Movie हर्षवर्धन रामेश्वर
  • सर्वोत्कृष्ट गीत – बालगम (द ग्रुप)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – पीव्हीएम एस रोहित (प्रेमिथुन्ना)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – शिल्पा राव ( Chaliya, जवान )
  • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधीस धिंडोरा बाजे गाण्यासाठी- वैभवी मर्चंट
  • सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन – सचिन सुधाकरन आणि हरिहरन मुरलीधरन – Animal
  • सर्वोत्कृष्ट ॲक्शन दिग्दर्शन – हनु-मॅन (तेलुगू)
  • सर्वोत्कृष्ट संपादन – मिधुन मुरली ( पुक्कलम )सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट – रोंगाटापू 1982
  • सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट – डीप फ्रिज
  • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – कथल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री
  • सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – कंदीलू- द रे ऑफ होप
  • सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट- उल्लोळुक
  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – श्यामची आई
  • सर्वोत्कृष्ट Odia चित्रपट – पुष्करा
  • सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट – Godday Godday Chaa
  • सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट – पार्किंग
  • सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट – भगवंत केसरी
  • सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – वश

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!